दिवसाला ४ लीटर दूध देणारी ही शेळी; वाचा, कसा होईल शेळी पालनासाठी फायदा

शेळीपालन करत असताना प्रामुख्याने शेळीच्या जातीची निवड हा प्राधान्याचा मुद्दा असतो. इथे जर चूक झाली तर संपूर्ण प्रकल्प फसू शकतो. त्यामुळे शेळीच्या जातीची निवड करताना शेली किती दुध देते, हे लक्षात घेणे महत्वाचे ठरते. शेली पालनाचे दोन फायदे म्हणजे जागा कमी लागते तसेच खर्चही कमी असतो. शेळी पालनातून दूध, मांस आणि खत या तिन्ही प्रकारातून पैसा मिळतो. 

आज आपण बीटल जातीच्या शेळीबाबत जाणून घेणार आहोत. बीटल जातीची शेळी मांस आणि दुधासाठी प्रामुख्याने उपयुक्त आहे. या शेळीच्या बोकडाचे वजन ५० ते ६० किलो आणि शेळीचे वजन ३५ ते ४० किलोपर्यंत असते. तर दिवसाला ही शेळी २ ते ४ लीटर दूध देते. 

कुठे मिळेल ही शेळी :-

बीटल जातीच्या शेळ्या मुख्यत: पंजाब आणि हरियाणामध्ये पहायला मिळतात. पंजाबच्या अमृतसर, फिरोजपूर आणि गुरुदासपूरमध्ये या शेळ्यांचे मोठ्या प्रमाणात पालन केले जाते.

या शेळीचे खाद्य काय :-

पिंपळ, आंबा, कडुनिंब, अशोका या झाडांचा पाला तसेच सुका, हिरवा चारा, हरभरा, शेंगदाणे, बार्ली यांचा चारा ही शेळी खाते.    

या शेळीला होतात हे रोग :-

ताप, डायरीया अशी लक्षणे असलेला कोकसीडियोसिस हा आजार सामान्यता छोट्या पिल्लांमध्ये पहायला मिळतो. साधारणपणे आठवडाभर बायोसील हे औषध दिल्यास ही पिले बरी होतात.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here