कृषी आधारीत व्यवसायांसाठी सरकार देतयं ४४ टक्के अनुदानावर २० लाखांच कर्ज; वाचा, कसा करावा अर्ज

मुंबई :

कृषीक्षेत्र हा भारताच्या ग्रामीण विकासाचा पाया आहे. ग्रामीण विकासासाठी सध्या अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकारकडून चालवल्या जात आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध मार्गे प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर देशात कृषी आधारित व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी सरकारकडून तुम्ही २० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळत आहे.

नव्याने शेतीत उतरलेले तरूण शेती आधुनिक पद्धतीने करू पाहत आहेत. परंतु त्यासाठी गरज आहे ती पैशांची… मात्र आता ज्यांना शेती आधारित व्यवसाय करायचा आहे त्यांना ही खास संधी उपलब्ध झाली आहे.

अशी आहे हे कर्ज योजना :-

  • या कर्जावर सरकार ३६ ते ४४ टक्के अनुदान देत आहे.
  • हे कर्ज खूप सहज मिळत आहेत, याबरोबरच या कर्जात अनुदानही दिले जात आहेत.

या कर्ज योजनेचे वैशिष्ट्ये :-

  • या योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल.
  • हे पैसे अ‍ॅग्री क्लिनिक आणि अ‍ॅग्री बिझिनेस सेंटर योजनेद्वारे दिले जाणार आहेत.
  • या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ४५ दिवसांचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
  • योजनेस आपण पात्र असल्याचे आढळल्यास नाबार्डमार्फत कर्ज मिळेल.

असे मिळेल अनुदान :-
१) एससी, एसटी आणि महिला अर्जदारांना ४४ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते.

२) या योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना ३६ टक्के अनुदान दिले जाते.

या कर्ज योजनेबद्दल अधिक माहितीसाठी १८००-४२५-१५५६ आणि -९९५१८५१५५६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here