सेन्सेक्सचे ‘एवढ्या’ अंशांनी नुकसान; निफ्टी निर्देशांकातही झाला एवढा बदल

पुणे :

कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही वाढताना दिसून येत आहे. काही राष्ट्रांमध्ये कोरोनाची दुसरी लाटही आली आहे. विशेषकरून युरोप-अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा आपला झटका दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावाचा थेट परिणाम जागतिक स्तरावर भांडवली बाजारात दिसून आला. जागतिक स्तरावर होणाऱ्या आर्थिक बदलांचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत असतो. स्थानिक बाजारात सेन्सेक्स ६०० अंशांनी आपटलेला दिसून आला आहे. तसेच त्याने ४० हजारांचा स्तरही सोडला असल्याचे समोर आले.

निफ्टी निर्देशांकही तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाच्या १२ हजारांच्या टप्प्यापासून दुरावलेला दिसले. आता गुंतवणूकदार जरासे मागे हटताना दिसत आहे. ही घसरण दिवसेंदिवस वाढतच आहे. कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांबाबतही अजून नेमका अंदाज कुणालाच बांधता येत नसल्याने भविष्यात नुकसानीची भीती लक्षात घेत गुंतवणूकदारांनी शेअर्स विक्री जोरात सुरु केली आहे.

एकाच दिवसात सेन्सेक्सची एवढी मोठी पडझड लक्षात घेता गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. सोमवारी सेन्सेक्सने ५०० अंशांहून अधिक गटांगळी नोंदविल्याने मुंबई शेअर बाजाराचे भांडवल एकाच सत्रात १.९८ लाख कोटी रुपयांनी खाली आले होते. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅपमध्ये एक टक्क्यापर्यंत घसरण नोंदली गेली.

मुंबई निर्देशांक ५९९.६४ अंश घसरणीसह ३९,९२२.४६ वर दिवसअखेर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५९.६० अंश घसरणीने ११,७२९.६० पर्यंत येऊन थांबला. सोमवारी सेन्सेक्सने ५०० अंशांहून अधिक गटांगळी नोंदविल्याने मुंबई शेअर बाजाराचे भांडवल एकाच सत्रात १.९८ लाख कोटी रुपयांनी खाली आले होते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here