आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यपालांना भेटणार; वाचा, काय आहे विषय

मुंबई :

काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना लिहिलेले पत्र समाजमाध्यमांमध्ये प्रचंड व्हायरल झाले. काही दिवसांपूर्वी राज्यपालांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तरात पाठवलेलं पत्रही अजून लोकांच्या आठवणीत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणारे राज्यपालांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज भेटणार आहेत. ते नेमकं का भेटनार आहेत, हा विषय अद्याप गुप्त ठेवण्यात आला असला तरीही राजकीय वर्तुळात अनेक चर्चा आहेत.

लॉकडाऊन आणि अनलॉकदरम्यान समाजातील विविध घटक आपले प्रश्न घेऊन राज ठाकरे यांना भेटले आहेत. त्यात कोळी बांधव, डबेवाले, मंदिरे सुरु करण्यासंदर्भात काही शिष्टमंडळे आणि अन्य घटकांनी राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. अशातच मंदिरांच्या प्रश्नाने जरा जोर धरला आहे. त्यामुळे हाच भेटीचा एक मुद्दा असू शकतो, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान आता राज ठाकरे हे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. आता या बैठकीत काय चर्चा होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेलं आहे.       

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here