अखेर जान कुमार सानू नमला; ‘असे’ म्हणत जाहीर केला माफीनामा

मुंबई :

गायक कुमार सानूचा मुलगा जण कुमार सानू याने टीव्ही रियलिटी शो बिग बॉस १४ मध्ये मराठी  भाषेबद्दल अपमानकारक आणि द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. मराठी माणसांनी समाजमाध्यमांवर याविषयी गंभीर भाष्य केले. तसेच मनसे आणि शिवसेनाही याप्रकरणी आक्रमक झालेले दिसून आले. दरम्यान कलर्स वाहिनीचे संचालन करत असलेल्या वायकॉम १८ या कंपनीने माफीनामा सादर केला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही पाठवला.

तरीही लोकांमध्ये संताप होता. मनसेने २४ तासात माफी मागण्यासाठी जान कुमार सानूला सांगितले होते. त्यानंतर बिग बॉस या कार्यक्रमात जानला त्याच्या चुकीची जाणीव करून देत त्याला नॅशनल टेलिव्हिजनवर माफी मागावी लागली. तो म्हणाला की, , मी नकळत एक चूक केली त्यामुळे मराठी माणसांच्या भावनाला धक्का लागला, मराठी माणसांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी यासाठी माफी मागतो. यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही असं त्याने सांगितले.

आधी मराठी भाषेबद्दल काय म्हणाला होता जान कुमार सानू :- ‘मला मराठी भाषेची चीड येते’, माझ्यासोबत मराठीत बोलायचे नाही, असे त्याने म्हटले होते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here