‘चिकन साते’ हा मलेशियाची अप्रतिम पदार्थ नक्कीच खा; रेसिपी वाचा एका क्लिकवर

आजपासून आम्ही आपल्या भेटीला जगभरातील शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ आणणार आहोत. आज आपण ‘चिकन साते’ या मलेशियन पदार्थाविषयी जाणून घेणार आहोत. मलेशिया देशातील पीनांग बेट हे खुप सुदंर ठिकाण आहे. तिथली खाद्य संस्कृती एकदमच अफलातून आहे. ती समजून घेताना तुम्हाला अनेक नवीन गोष्टी समजतील. पीनांग बेट हे आशियातले “खवय्याचे नंदनवन” म्हणून ओळखले जाते. तिथलाच एक अप्रतिम आणि चवदार असलेला पदार्थ म्हणजे ‘चिकन साते’. इथे पण मांसाहारी पदार्थ बनवताना आपल्यासारखे सर्व मसाले वापरतात.

साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 200 ग्रॅम बोनलेस चिकन
 2. 1 टेबलस्पुन हळद
 3. 1 टेबलस्पुन लाल तिखट
 4. 1 टेबलस्पुन धणे पावडर
 5. 1 टेबलस्पुन गरम मसाला
 6. 2 टेबलस्पुन कांंद्याची पेस्ट
 7. 2 टेबलस्पुन आले लसुण पेस्ट
 8. 2-3 टेबलस्पुन तेल

हे साहित्य घेतले असले तर वाट कसली बघताय… लागा की बनवायला…

 1. बोनलेस चिकनचे लांब पातळ तुकडे करावे. 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवावेत.
 2. एका बाऊल मध्ये कांद्याची पेस्ट, आले लसुण पेस्ट, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणे पावडर, मीठ एकत्र मिसळुन घ्यावे. त्या मसाल्यात चिकनचे तुकडे मिसळुन घ्यावे. चिकनला सर्व मसाला मुरला पाहिजे. हे कमीत कमी 30 मिनीटे झाकुन ठेवावे.
 3. स्किवरच्या काठ्या घेउन त्यात चिकनचे तुकडे ओवुन घ्यावे. एका काठीला एक तुकडा भरावा
 4. लोख़ंडी तवा गरम करावा. त्यावर एक चमचा तेल सोडावे. त्यात हे चिकनचे स्किवर ठेवुन तळावे. दोन्ही बाजुने खरपुस भाजुन घ्यावे. जर कोळसे असतील कोळश्यावर पण हेस्किवर जाळी ठेवुन भाजु शकता. हे चिकन साते शेंगदाण्याच्या सॉस सोबत खातात.

संपादन : संचिता कदम 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here