ऑनलाईन फिशिंगला नका पडू बळी; वाचा खरेदी करण्यासाठी महत्वाच्या ट्रिक्स

सणासुदीचा काळ आला की अनेक ऑनलाईन खरेदी-विक्री कंपन्या नव्या ऑफर्स घेऊन येतात. आताही अमेझॉन, फ्लिपकार्ट असोत की इतरही काही कंपन्या असो. सगळ्यांनी खास ऑफर आणण्याची तयारी केली आहे. उलट रिलायन्स कंपनीच्या जिओमार्ट यामुळे जुन्या कंपन्यांना मोठे आव्हान उभे राहिलेले आहे. अशावेळी सायबर भामटे आपल्याला फिशिंग अर्थात फसवणुकीच्या जाळ्यात ओढून खिशातील म्हणजे खात्यामधील किंवा क्रेडीट व डेबिट कार्डावरील पैसे चोरू शकता. त्यासाठी काळजी घेऊन ऑनलाईन शॉपिंगचा आनंद घ्या.

दसरा व दिवाळीच्या काळात आपल्या सर्वांना खरेदीचा मोह होतो. वर्षभरातील हे दोन महत्वाचे सण म्हणजे आनंद आणि उत्साह घेऊन येणारे केंद्रबिंदू. आताही सगळीकडे त्याचीच लगबग सुरू आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन खरेदी करण्याचे आडाखे बांधलेले असतील. होय, काळानुरूप बदल म्हणून ऑनलाईन शॉपिंग करणे आता सगळ्यांच्या आवाक्यात आलेले आहे.

अशावेळी काही कंपन्या किंवा छोटे पोर्टल ग्राहकांची फसवणूक करायलाही पुढे येतात. तोच त्यांचा मूळ धंदा असतो. त्यामुळे कोणत्याही पोर्टलवर शॉपिंग करताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. नाही तर ऐन दिवाळीतच दिवाळे निघण्याचा मोठा धोका आहेच की. वाढती ऑनलाईन खरेदी यासह सामान्य माणसांचा वाढता इंटरनेटचा वापर लक्षात घेऊन दिवाळीच्या काळात ऑनलाईन शॉपींग करणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांचे रॅकेट प्रतिवर्षी सक्रीय होते. यंदाही करोनाच्या काळात वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर अशा भामट्यांची संख्या वाढलेली असू शकते.

सणासुदीच्या काळात आपल्या किंवा कुटुंबातील प्रेमळ व्यक्तीच्या आवडत्या रंगाची, डिझायनची आणि लेटेस्ट फॅशनच्या वस्तू, कपडे आणि भरपूर खरेदी कराव्याश्या वाटता. अशा वस्तू आपल्याला एकाच क्षणांत इंटनेटवर पहायला मिळतात. त्यांचे लुक आपल्याला लगेच खरेदीसाठी खेचून घेतात. मात्र अशा वस्तू ऑनलाईन शॉपिंग करताना अनेकदा फसवणूकही होऊ शकते. त्यामुळे शक्यतो सर्व माहिती असलेल्या आणि नवीन असेल तरीही विश्वासार्हता असलेल्या पोर्टलवर जाऊनच खरेदी करावी.

आपण जशी ऑफलाईन शॉपिंग करतो त्याच पद्धतीने ऑनलाईन शॉपिंग करता येते. अशी खरेदी करणे काहीही गैर नाही. मात्र, अनेकदा फसवणुकीच्या बातम्या वाचून आणि पाहून आपण त्या ऑनलाईन-फिनलाईनच्या नादी लागत नाहीत. मात्र, या खरेदीत एका लहानश्या चुकीमुळे खिशातील मोठी रक्कम आपण झटक्यात गमावू शकतो. त्यामुळे माहिती घेऊन आणि माहिती नसल्यास माहितगार मित्र व नातेवाईक यांची मदत घेऊन याची खरेदी करावी.

ऑनलाइन पद्धतीने खरेदी करण्यापूर्वी संबंधित वेबसाईटची माही घ्यावी. तसेच कुठूनही सुरक्षित खरेदी कशी करावी याची सर्वांगीण माहिती इंटरनेटवरुन घ्यावी. प्रॉडक्ट खरेदी करताना त्याचा दर्जा आणि इतर माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यावी. तसेच त्या कंपनीची आॅनलाईन खरेदी संदर्भातील माहिती किंवा लोकांनी लिहिलेले रिव्ह्यू वाचून घ्यावेत.


ऑनलाईन पद्धतीने प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपनीची आणि त्यांच्या वेबसाईटची सत्यता तपासून पाहावी. पोर्टलवर दिलेली सर्व माहिती नीट वाचून गरज पडली तर फोन करून सत्यात पडताळून पहावी. खरेदी झाल्यानंतर मग पैसे देण्याचे पेज दिसते. त्यावेळी आर्थिक माहिती आणि तपशील भरताना काळजी घ्यावी. आपल्या खात्याची बँक असलेली खरी वेबसाइट लिंक दिलेली असली तरच पुढे जावे.


शक्यतो शॉपिंग झाल्यानंतर आलेले ई-बिल तपासून लगेच घ्यावे. थेट आपले खाते असलेली बँक किंवा ऑनलाइन खरेदीसाठीची कंपनी याशिवाय इतर कोणत्याही मध्यस्थ वेबसाईटवरुन आर्थिक व्यवहार करू नयेत. मात्र, पेयू मनी, पे झाप अशा काही पोर्टलला जोडलेले असल्यास असे पेमेंट करण्यास काहीच हरकत नाही.


सर्वात महत्वाचे म्हणजे मौल्यवान असलेली वस्तू खूप स्वस्त दरात विकली जात असेलल्या वेबसाईटकडे अजिबात ढुंकूनही पाहू नका. कारण, तिथेच फसवणुकीची शक्यता जास्त असते. आपण खरेदी केल्यावर खरेदी केलेली वस्तू तोडफोड असलेली किंवा त्याला काहीतरी गॅरंटी मिळत असेल तरच अशी वस्तू ऑनलाईन खरेदी करावी.


ऑनलाईन शॉपिंग करताना कोणालाही आपल्या क्रेडीट कार्ड किंवा डेबिट कार्टचा पिन नंबर देत बसू नका. तो देण्याची काहीही गरज नसते. यासह सीसीव्ही नंबर आणि कार्डच्या मागील सिक्युरिटी नंबर व इतर माहिती स्वत: भरून ऑर्डर पूर्ण करा. अशा पद्धतीने आपण खरेदी करताना सर्व काळजी घेऊन खरेदी करून ऑनलाइन शॉपिंगचा आनंद घेऊ शकता.

लेखन व संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here