म्हणून कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नका; शरद पवारांचे स्पष्टीकरण

नाशिक :

गेल्या ३ दिवसांपासून नाशिकमधिल बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद आहेत. कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत व्यापारी, शेतकरी यांच्या बैठका सुरु आहेत. आज कांदा प्रश्नावर बोलण्यासाठी एक शिष्टमंडळ दिल्लीला जाणार असल्याची माहिती पवारांनी दिली.

यावेळी नाशिकमध्ये पुढे बोलताना पवार म्हणाले की, कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये. महाराष्ट्रच्या जिल्ह्याची वैशिष्ट्य आहेत त्यापैकी नशिक एक. कांदा प्रश्न उदभवला नाही आणि नाशिकला आलो नाही असं होत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या कांद्यात नाशिकचा कांदा असतो. राजस्थान, गुजरातमध्ये कांदा लागवड होते, पण नाशिकच्या कांद्याचा दर्जा पहिला क्रमांकाचा असतो. कांद्याच्या दरात कायम चढ उतार आहेत, हा कठीण प्रश्न आहे. यावर राज्य सरकारने नव्हे तर केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज आहे.  राज्य सरकारकडून फारशी अपेक्षा करू नये, कारण राज्य सरकारकडे काही अधिकार नाहीत. 

यासंबंधी केंद्र सरकारचे जे संबधित प्रतिनिधी आहे त्यांची भेट घेणार आहे. व्यवहार सुरळीत होणार यासाठी केंद्राने पुढाकार घेणं गरजेचं आहे. कांद्याचा भाव वाढला की, लासलगावला धाड टाकली जाते. लासलगाववर आयकर विभागाचे प्रेम आहे. याबाबतही त्यांच्यासोबत बोलणार आहे, असेही पुढे बोलताना पवारांनी स्पष्ट केले.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here