लग्नासाठी तिथे रंगतो जीवघेणा खेळ; तर, सौंदर्य म्हणजे वर्तुळाकार मोठे ओठ..!

जगभरातील धर्म, जाती आणि सामाजिक जीवनात कुठे कशाला महत्व असेल याचा काहीही नेम नाही. आपल्याकडे असलेली धर्माची किंवा सौंदर्याची कल्पना इतर भागात कदाचित मूर्खपणाचीही समजली जाऊ शकते. अशाच पद्धतीने आपल्याला जीवघेणी आणि क्रूर सौंदर्याची व्याख्या वाटू शकते अशी परंपरा आज पाहूयात.

आफ्रिका खंडामधील इथिओपिया नावाच्या देशातील सुरी नावाच्या आदिवासी जमातीत काही वेगळ्या आणि धक्कादायक वाटणाऱ्या प्रथा आहेत. सरकारने त्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला मात्र, जीवघेणी असूनही ही प्रथा त्या देशातील सरकारला पुन्हा सुरू करावी लागली. कारण, परंपरा नावाच्या जोखडातून बाहेर निघण्याची तेथील जनतेची अजिबात तयारी नाव्हात्ती.

अगोदर आपण त्यांच्या लग्नाच्या जीवघेण्या खेळाबद्दल माहिती पाहूयात. तेथे उपवर मुलांना लग्नासाठी फायटर कोंबड्यांसारखे एकमेकांशी झुंजावे लागते. अनेकदा त्यामध्ये एका तरुणाचा जीवही जातो. मुलाच्या व मुलीच्या घरच्यांच्यासमोर आणि गावासमोर हा जीवघेणा खेळ रंगतो. त्यावेळी दोन्ही तरुण लग्नासाठी एकमेकांना मारण्यासाठी लढतात. दोघेही नग्नपणे हा खेळ दुर्दैवाने खेळत असतात आणि जनता हे उघड्या डोळ्यांनी पाहत असते. त्यात जो जिंकतो किंवा दुसऱ्याला मारून टाकतो त्याच्याशी मुलीचा विवाह केला जातो.

तर, मुलींच्या सौंदर्याच्या व्याखेलाही वेगळी किनार आहे. आपण ब्लॅक पँथर नावाचा इंग्रजी सिनेमा पाहिलाय ना? त्यात काही व्यक्तींच्या ओठाला गोलाकार असा आकार असतो. ती प्रथा याच सुरी नावाच्या आदिवासी जमातीमध्ये आहे. इथे ज्यांचे ओठ जितके मोठे आणि गोलाकार तितकी ती महिला वा तरुणी सुंदर अशी व्याख्या आहे. त्यासाठी हे मुलगी मोठी झाली की तिचे दोन दात पडून तेथील ओठाला छिद्र पडतात.

मग या छिद्रातून लाकडी गोल किंवा मातीचा गोल बसविला जातो. मुलगी जशी मोठी होईल तसे त्या गोलाची साईज वाढवण्यासाठी त्यात वेगवेगळे अशाच प्रकारचे घटक बसवले जातात. मग तयार होतो मोठा गोलाकार ओठ. त्या गोलाकार ओठात मग अनेकदा वेगवेगळे आकार केलेलं असतात. यामध्ये महिलांना पार्टनर निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र, महिलांना सुंदर दिसण्यासाठी ओठ कापावे लागतात आणि त्यात गोलाकार वस्तूही बसवावी लागते. तर, तरुणांना आपला पार्टनर निवडीसाठी जीवावर उदार व्हावे लागते.

एकूणच आधुनिकीकरण नावाची गोष्ट काहिती फोफावत असली तरी जातीय आणि धार्मिक प्रथा, रूढी आणि परंपरा यांच्या जोखडात अजूनही आपला समाज पूर्णपणे अडकला आहे. काही समाज यातून बाहेर येत आहे. तर, काहीजण अजूनही अशा जीवघेण्या परंपरांना कवटाळून बसलेले आहेत.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here