हेलिकॉप्टरमुळे ‘या’ खासदाराचे पक्षाने कापले होते तिकीट; वाचा काय घडला होता किस्सा

अहमदनगर :

जिल्हा परिषद निवडणुकीत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसमध्ये असतांना हेलिकॉप्टरने फिरत उमेदवारांचा प्रचार केला होता. मात्र, याच हेलिकॉप्टरमुळे माझे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे लोकसभेचे तिकीटच कापले गेले होते, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी भर सभेत सांगितले. पुढे बोलताना त्यांनी स्वतःच हा किस्सा सांगितला आहे.

२०१७ मध्ये झालेल्या नगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नगर जिह्याच्या राजकारणात विखेंचा हवाई प्रचार चांगलाच गाजला होता. त्यातच नुकत्याच वाळकी येथे झालेल्या एका कार्यक्रमात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने विखेंसमोरच त्यांच्या हेलिकॉप्टर प्रचाराची आठवण करून दिली. हाच धागा पकडत विखे यांनी आपल्या भाषणात हेलिकॉप्टर प्रवासामुळे झालेला फायदा व तोटय़ाचा किस्साच सांगितला.

यावेळी खा.डॉ.विखे म्हणाले की, ‘आता मी भाजपचा खासदार आहे. आपले हेलिकॉप्टर तेव्हाही होते व भविष्यातही फिरत राहणार. त्यावेळी हेलिकॉप्टरमुळे माझे तिकीटही कापले गेले होते. त्यावेळी मी काँग्रेसमध्ये होतो व राष्ट्रवादीशी आघाडी होती. त्यावेळी ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला विचारले होते की, तू आताच हेलिकॉप्टरमध्ये फिरतोस. निवडून कसा येणार?’, हा प्रश्न स्वतः पवारांनी विचारल्याचीही आठवण यावेळी विखे यांनी सांगितली.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here