धक्कादायक : कोंबड्याच्या खेळात झाला पोलिसाचा मृत्यू; पहा कुठे घडली ही दुर्दैवी घटना

जगात कोणत्या प्रकारच्या दुर्घटना घडू शकतात याचा अंदाज अजूनही कोणालाच येऊ शकलेला नाही. कारण, वास्तव हे कल्पनेच्या पल्याड असते. दुर्घटनेच्या वेगवेगळ्या प्रकारांद्वारे अनेकदा माणसाचा जीवही जातो. अशाच एका दुर्दैवी घटनेत कोंबड्याच्या हल्ल्यात पोलीस अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

‘तुपडा’ अर्थात फायटर कोंबड्यांचा जीवघेणा खेळ हा जगभरात अनेकांचा ‘आवडता’ खेळ आहे. अनेक ठिकाणी कोंबड्यांवर पैसे लावून हा खेळ खेळला जातो. माणसांच्या वतीने तिथे कोंबडे एकेमेकांचा जीव घेतात. या जीवघेण्या आणि क्रूर खेळामुळे अनेकांना पैसे कामाविल्याचा आणि काहींना गमाविल्याचा आनंद मिळतो. अशाच एका अवैधरीत्या सुरू असलेल्या कोंबड्यांच्या झुंजीचा खेळ बंद करण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायाला आपला जीव गमवावा लागला आहे.

भारतात नाही परंतु, फिलीपीन्‍स या देशात ही दुर्दैवी घटना घडली आहे. तिथे ‘तुपडा’ या नावाने हा खेळ लोकप्रिय आहे. तिथे त्याला मान्यताही आहे. मात्र, सध्या करोना विषाणूची जीवघेणी साथ सुरू असल्याने तिथेही सगळे खेळ बंद आहेत. मात्र, तेथील बुकींनी एका ठिकाणी हा खेळ आयोजित केले होता. त्यासाठी कोंबड्यांच्या पायांना नेहमीप्रमाणे ब्लेड (गाफ) बांधण्यात आलेले होते. पोलीस टीम तिथे पोहचल्यावर त्यांनी हा खेळ बंद करण्याच्या सूचना दिल्या.

पोलीस पाहून सगळेच तेथून वेगाने पसार झाले. मात्र, त्याचवेळी कोंबडे एकमेकांचा जीव घेण्यासाठी त्वेषाने लढत होते. पोलिसांनी तेही रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका कोंबड्याच्या ब्लेडचा फटका अधिकारी लेफ्टिनेंट क्रिस्टिचन बोलोक यांच्या मंदीच्या धमनीवर बसला. त्याने वेगाने रक्तस्त्राव सुरू झाला. अखेरीस वेळीच उपचार न मिळाल्याने पोलीस शिपायाचा यात दुर्दैवी मृत्यू झाला.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here