आज पुन्हा सोन्याचांदीच्या दरात घसरण; वाचा, काय आहेत दर

मुंबई :

दसऱ्याच्या मुहूर्तावरही अपेक्षित असा व्यवसाय सोने व्यापाऱ्यांना मिळाला नाही. जसा दसरा संपला तसे सोन्याच्या भावात घसरण सुरु झाली आहे. . आठवड्याच्या पहिल्याच दिवशीही सोन्याच्या दरात काही प्रमाणत घट झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने खाली कोसळत होते. ५७ हजाराला टेकलेले सोने आता थेट ५० हजारांवर आले होते. आता चालू महिन्यात भाव कमी-जास्त होत आहेत. 

सोन्याचे भाव सध्या एकदमच अस्थिर आहेत. कधी अचानक घट तर कधी अचानक वाढ होत आहे. आज बुधवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली. सध्या सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ५०९४३ रुपये असून त्यात १८ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा एक किलोचा भाव ६२०६५ रुपये असून त्यात २१६ रुपयांची घट झाली आहे.

जगभरातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेत आर्थिक पॅकेजबाबत अद्यापही अनिश्तितता आहे. परिणामी सोन्याच्या किंमती सातत्याने उतरत आहेत. परदेश बाजाराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर नेहमी दिसून येत असतो. कमॉडिटी बाजारात सोने अजूनही त्याच्या विक्रमी स्तरापासून ५५०० रुपयांनी स्वस्त आहे. सोन्यातील सध्याचा ट्रेड पाहता सोने ५१२०० पर्यंत स्थिरावेल, असा अंदाज जिओजित फायनान्शिअल या ब्रोकरेज संस्थेने व्यक्त केला आहे.     

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here