धक्कादायक : पाकिस्तानने केली ‘ती’ घोडचूक; पहा कसे पडलेत ते तोंडावर

पाकिस्तानमधील राजकीय गोंधळ कमी होण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत हुकुमशाही आणि धार्मिक जोखडात अडकलेल्या त्या देशातील नेतृत्वाने पुन्हा एकदा घोडचूक केली आहे. त्यामुळे जागतिक राजकारणार ते तोंडावर पडले आहेत.

नुकत्याच फ्रांस देशातील एका दुर्दैवी घटनेने धार्मिक दहशतवाद आणि अविवेकी समाजामध्ये काय घडू शकते याची साक्ष पटली आहे. त्या घटनेने अवघे जग पुन्हा एकदा आवक झालेले आहे. एका मुस्लीम माथेफिरूने थेट एका शिक्षकाची कत्लेआम करून टाकण्याची ही भयानक घटना सध्या त्यामुळे जगभरात चर्चेत आहे.

या घटनेबद्दल बोलताना फ्रांसचे राष्ट्रपती इमैनुएल मैक्रों यांनी इस्लामिक दहशतवादावर भाष्य केले. त्याने धर्माचे अधिष्ठान मानणाऱ्या पाकिस्तानलाही मोठा झटका बसला. अशावेळी त्यांनी फ्रान्सच्या वक्तव्याचे खंडन केले. तसेच पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी तर फ्रान्समधून आपले राजदूत माघारी बोलाविण्याच्या घोषणा केली.

कुरेशी यांच्या त्या प्रस्तावाला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार पाठींबा दिला. मात्र, नंतर स्पष्ट झाले की, पाकिस्तानी राजाडून मागील किमान ३ महिन्यांपासून फ्रान्समध्ये नाहीत. आपल्याच खात्यातील महत्वाची माहिती न ठेवता पोकळ घोषणा देण्याच्या मंत्री कुरेशी यांच्या प्रकरणाची आता जगभर वाच्यता झाली आहे.

एकूणच यानिमित्ताने पाकिस्तानात सामाजिक व धार्मिक गोंधळ टिपेला असतानाच राजकीय गोंधळ तर आणखी पराकोटीला पोहोचला असल्याची यानिमित्ताने चर्चा सुरू झाली आहे. जिथे कोणीही नाही, त्यांन मागे बोलवले तरी कसे जाणार हाच प्रश्न अनेकांना पडल्याने पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली आहे. आता इस्लामाबाद येथील फ्रान्सच्या राजदूतांना त्यांच्या देशात पाठवण्याच्या हालचाली करून पाकिस्तान आपला मूर्खपणा झाकण्याच्या नादात आणखी एक घोडचूक करायला निघाल्याची बातमी आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here