पंकजा मुंडेंचे कौतुक करत रोहित पवारांचा ‘त्यांना’ टोला; वाचा, काय म्हणाले पवार

अहमदनगर :

‘hats off’ म्हणत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे कौतुक केले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे युवा नेते व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ‘धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे’ असं म्हणत पंकजा यांचे कौतुक केले.

पुढे बोलताना रोहित पवारांनी ‘अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा’, असे म्हणत भाजप नेत्यांना टोलाही लगावला.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातीलच भाजप नेते महाराष्ट्राची बदनामी करत आहेत, असे चित्र समाज माध्यमांसमोर उभे राहिले होते. तसेच बिहार निवडणुकीत प्रभारी असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी बिहारचे तोंडभरून कौतुक केले होते. त्यामुळेही महाराष्ट्रातील नेटकरी त्यांना ट्रोल करत होते. यावरून नाव न घटा हा टोला फडणवीस यांना हाणला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नेमकं काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे :-  

शरद पवार hats off … कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले … पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here