घराची सजावट करताना ‘ही’ घ्या काळजी; वाचा, कारण प्रश्न आहे आपल्या स्वीट होमचा

घर आवरणे आणि सजावट करण्याचा सध्या काळ चालू आहे. कारण दिवाळीची चाहूल आपल्याला लागली आहे. अशावेळी एक गोष्ट आपल्याला सर्वांना ध्यानात घ्यावी लागेल ती म्हणजे आपल्या घरातील सजावट बेस्ट करण्याची. कारण आपले स्वीट होम सुंदर दिसले तरच त्यात प्रसन्नता वाटेल आणि सुख-समाधानाचे वारे त्यातून वाहील.

तर, मित्र-मैत्रिणींनो, घराची सजावट हा मनाच्य सुंदरतेचा आणि आपल्या कौटुंबिक सुखाच्या सकारात्मक उर्जेचा मिलाप आहे. अशावेळी आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक आणि घराची गरज लक्षात घेऊन सजावट करावी. खूप आकर्षक दिसण्यासाठी जास्त मेकअप करून जसा काहीही फायदा होत नाही. उलट त्याने सौंदर्यात डाग लागतो. किंवा भविष्यात त्याचा विकतचा मनस्ताप सहन करावा लागतो. तसाच प्रकार घराच्या बाबतीतही घडू शकतो.

घर सजवण्यासाठी सुरुवात करताना सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही गृहसज्जा करणाऱ्याची गरज असेल तरच मदत घ्या. कारण, ही मंडळी आम्ही कसे बेस्ट सल्ले देतो हे दाखवण्याच्या नादात बऱ्याचदा जास्तीचा खर्च करायला लावू शकतात. तसेच अशावेळी सल्ले देणारे बहुसंख्य भेटतात. त्याकॅह्वेली आर्थिक किंवा कामात मदत करणाऱ्यांची हजेरी अजिबात नसते. त्यामुळे सगळ्यांचे ऐकून घ्या आणि मनाला वाटेल तेच करा.

आपले घर आणि त्याच्या सर्व खोल्या यांचा कागदावर किंवा जर शक्य असेल तरच डोक्यात नकाशा बनवून नियोजन करा. कारण, डोक्यात आपण बनवलेले चित्र बऱ्याचदा वास्तवात उतरवणे शक्य होत नाही. त्यामुळे कागद आणि त्यावरील लेआऊट यासाठी खूप महत्वाचा आहे.

विचार न करता कोणताही निर्णय अजिबात घेऊ नका. कारण, त्यामुळे वेळ आणि पैसा असा दोन्हींचा अपव्यय होण्याची शक्यता जास्त असते. पिवळ्या टाईल्स लावायचे सोडून शक्यतो ग्रे (करड्या) रंगाच्या टाईल्स लावा. कारण, त्यामुळे भविष्यात त्यांचा रंग खराब होत नाही. किंवा साफसफाईचे काम वाढत नाही. छोटे समान एकाच खोलीमध्ये अनु नका. नंतर ते एकत्र झाल्यावर मोठी जागा व्यापते. खिडक्यांना भडक रंगाचे पडदे लावल्याने प्रकाश व्यवस्थित आत येत नाही. तसेच बाहेरील खुली हवा आणि सौंदर्य पाहण्यासाठीचीही काळजी घेत राहा.

कुठेही प्रसिद्ध झालेल्या मासिकातील फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसणारे घर आपल्या सत्यात उतरवण्याची अजिबात चूक करू नका. तसेच फोटो फ्रेम लावताना त्या खूप उंचावर लावू नका. आपल्या नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या आणि लक्ष वेधून घेणाऱ्या ठिकाणी निवड करून अशा फ्रेम बसवून घ्याव्यात.

अशा पद्धतीने घराची सजावट आणि रंगरंगोटी करताना महत्वाची काळजी घ्या. अनेकदा शेजार्यांनी असे केले मग आपणही तसेच किंवा त्यांच्या रीसवर आणखी काहीतरी भन्नाट करावे असे आपल्याला वाटते. मुळात आपली गरज काय आहे, घर कुठे आहे आणि महत्वाचे म्हणजे आपला खिसा कितपत गरम आहे हेच लक्षात घेऊन घराच्या सजावटीचा निर्णय करावा. उगीचच आपले मित्र किंवा नातेवाईक ‘ते’ लैच बेस्ट वाटेल असे सल्ले देत असल्यास होय ट्राय करू असेच मोघम उत्तर देऊन विषय काटवावा.

कारण, सल्ले देणे हे जरी फुकट असले तरी ते गृहसजावट करताना आणि मुख्य म्हणजे जर अयोग्य असेल तर ते काढून टाकताना मोठा भुर्दंड बसतो. अशावेळी योग्य पद्धतीने विचार करूनच आणि आपल्या ऐपतीप्रमाणे खर्चाचे आणि सजावटीचे नियोजन करावे. सजावटीत प्लायवूड किंवा खूप लायटिंग वाढवून घरामध्ये आगीच्या घटना होण्याची शक्यता अजिबात वाढणार नाही याचीही काळजी घ्या.

घर हे राहण्याची गोष्ट आहे. मिरवणे आणि फुशारकी मरणे यासाठी अजिबात नसते. त्यामुळे लोकांना त्याचे लैच कौतुक वाटेल असे वाटून काहीबाही अजिबात करू नका. कारण, त्यामुळे जर वेगळेच काही झाले आणि जास्तीचा भुर्दंड बसला तर त्यानेही आपली सामाजिक प्रतिष्ठा खराब होऊ शकते. तसेच त्याचा वाढीव खर्च आपल्याला सहन करतानाच टोमणे किंवा खासगीत कानाआड होणाऱ्या चर्चा ऐकायची वेळही येऊ शकते. त्यामुळे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे..!

लेखन व संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here