स्वतःच्या मुलाच्या कोरोनामुक्तीबाबत ट्रम्प यांनी केला अजब दावा; वाचा, नेमकं काय म्हटलं त्यांनी

दिल्ली :

अमेरिकेत कोरोनाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे मृत्यूंची संख्याही ईतर देशांच्या तुलनेत जास्तच होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा आटोक्यात आल्याचे चिन्ह दिसत असताना वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अजबच दावा केला आहे. आपल्या मुलगा अवघ्या १५ मिनिटात कोरोनामुक्त झाल्याचा अजबगजब दावा त्यांनी केला आहे.

सध्या जगाच्या राजकीय पटलावर ज्या निवडणुकीकडे लोकांचे लक्ष लागलेले आहे. अशी अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूकीचा प्रचार जोरात चालू आहे. पेंसिलवेनियाच्या मार्टिन्सबर्ग येथील एका निवडणूक रॅलीत आपल्या समर्थकांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी आपल्या मुलाच्या रोगप्रतिकारक शक्तीचा उल्लेख करत तो 15 मिनिटात कोरोनामुक्त झाला असल्याचे म्हटले.

जगभरात कोरोनाचा कहर माजला असताना कोरोनावर किमान आठवडाभर उपचार घ्यावे लागतात. आता ट्रम्प यांच्या मुलाकडे अशी काय जादुई शक्ती आहे की त्याचा कोरोना १५ मिनिटात गायब झाला, अशी चर्चा लोकांमध्ये आहे. काही दिवसांपुर्वी मेलनिया ट्रम्प आणि बॅरेन ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, बॅरेनने त्यानंतर आपल्याला शाळेत जायची इच्छाही व्यक्त केली असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here