नोकरीची सुवर्णसंधी: नीती आयोग आणि एनसीएलमध्ये निघाली मोठी भरती; असा करा अर्ज

दिल्ली :

कोरोनाच्या या आर्थिक संकटाच्या काळात एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नीती आयोग आणि एनसीएलमध्ये मोठी भारती निघाली आहे. एका बाजूला कामगारांची पगार कपात तसेच कर्मचारी कपात होत असताना नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI) आयोगाने विविध पदांसाठी  तर एनसीएलने सुद्धा ४८० पदांसाठी मोठी भरती काढली आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया (NITI) आयोग भरतीसंबंधी महत्वाची मुद्देसूद माहिती :-

  • – अधिकारी आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी या पदांसाठी भरती
  • – नोकरीचे ठिकाण नवी दिल्ली
  • – संशोधन अधिकारी – २६ ते ३५ या वयातील उमेदवार अर्ज करू शकतात.
  • – वरिष्ठ संशोधन अधिकारी – २६ ते ४० या वयातील उमेदवार अर्ज करू शकतात.
  • – अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबर २०२०

एनसीएल :-

  • – नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेडने (एनसीएल) शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत.
  • – शिक्षण :-  दहावी-बारावी उत्तीर्ण 
  • – अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२०
  • – http://nclcil.in/ या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here