टाटा उद्योग समूह ‘अॅपल’मध्ये करणार ‘एवढी’ मोठी गुंतवणूक; वाचा, कसा झाला करार

मुंबई :

टाटा हा भारतातील मोठ्या उद्योगसमूह आता पुन्हा नवे पाऊल टाकत ‘अॅपल’च्या साथीने मोबाईलक्षेत्रात उतरायला सज्ज झाला आहे. ‘अॅपल’ या जगप्रसिद्ध असणाऱ्या मोबाईल कंपनीचा भारतातील प्लॅन्ट तामिळनाडूच्या होसूरमधील औद्योगिक वसाहतीमध्ये असणार आहे. भारतातील अनेक राज्य ‘अॅपल’चा प्लॅन्ट स्वतःच्या राज्यात घेण्यासाठी इच्छुक असताना सर्वाना मागे टाकत आपल्या राज्यात हा प्लॅन्ट आणण्यात तामिळनाडूने बाजी मारली आहे. या अॅपल कंपनीमध्ये टाटा समूह तब्बल ५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

विशेष म्हणजे टाटा उद्योग समूह अॅपलसोबतच अन्य घटकावरही गुंतवणूक करणार असून, ती ८ हजार कोटीपर्यंत जाणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. तामिळनाडू औद्योगिक वसाहतीमध्ये टाटा इलेक्ट्रॉनिस्कला प्रकल्प उभारणीसाठी 500 एकर जागा देण्यात आली आहे, अशीही माहिती एका वृत्तसंस्थेच्या हवाल्यानं tv९मराठीने दिली. होसूरमधील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या या प्लॅन्टमध्ये ‘अॅपल’साठी लागणारे सुट्या भागांची निर्मिती केली जाणार आहे. अद्याप टाटा समूह किंवा तामिळनाडू सरकारकडून अद्याप याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

या आहेत या प्रकल्पाच्या विशेष गोष्टी :-

  • या प्रकल्पासाठी टायटन इंजिनिअरिंग अँड ऑटोमेशन लिमिटेड अर्थात TEALकडून मदत पुरवली जाणार आहे.
  • या प्रकल्पात पुढील वर्षभरात १८ हजार कर्मचाऱ्यांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळतेय.
  • ९० टक्के महिला कर्मचारी असतील.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here