म्हणून कांद्याच्या दरात होत आहे घसरण; वाचा, काय आहे कारण

पुणे :

राज्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. विविध ठिकाणी पिक वाहून गेलेलं होत. त्यामुळे अचानक जुन्या कांद्याचे भाव वाढले. तसेच नव्या कांद्याची आवक आता कमी होणार असल्याने तसेच कमी प्रमाणात उपलब्ध असलेला जुना कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे. मात्र आता केंद्र सरकारने साठा करण्यासाठी घालून दिलेला नियम, सर्वदूर थांबलेला पाऊस आणि कांदा निर्यातबंदीमुळे कांद्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे.

दोन महिन्यांपूर्वी कांद्याची घाऊक बाजारात 15 ते 20 रुपये किलो भावाने विक्री चालू होती आता त्यात दुपटीने वाढ होऊन नवीन कांद्याला किलोस 30 ते 50 रुपये तर जुन्या कांद्यास 70 ते 85 रुपये भाव मिळू लागला होता. आता पुन्हा कांद्याच्या दरात घसरण सुरु झाली असून कांद्याचे दर 20 ते 25 रुपयांनी उतरले आहेत.

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा परिसरातून नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. जुन्या कांद्याचे गेल्या आठवड्यात एका किलोसाठी ८५ रुपये दर होते. आता ते दर ६५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. ‘कांदा साठवणुकीवर सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. त्यात पाऊस थांबल्याने कांदा आयातीमुळे आता दरवाढीवर नियंत्रण येऊ लागले आहे’, अशी माहिती कांदा व्यापाऱ्याने दिली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here