विधान परिषदेच्या १२ जागांसाठी महाविकास आघाडीकडून ‘या’ नावांची आहे चर्चा; वाचा सविस्तर

मुंबई :

सध्या विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांच्या वाट्याला ४-४ जागा येणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून अनेक लोक उमेदवार इच्छुक आहेत. पण नेमकी लॉटरी कुणाला लागणार, हे स्पष्ट झालेले नाही. तिन्ही पक्षांकडून जी नवे फायनल होतील, या १२ नावांच्या शिफारशीची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवण्यात येईल.

असे आहेत पक्षावाईस इच्छुक उमेदवार :-

राष्ट्रवादी कॉंग्रेस :- ३००

कॉंग्रेस – ५०

शिवसेना – १५

मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, युवा सेनेचे राहुल कनाल, विजय करंजीकर, भाऊसाहेब चौधरी, नितीन बानगुडे पाटील आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह अजून २-३ नावांची शिवसेनेकडून चर्चा आहे. तर कॉंग्रेसकडून प्रवक्ते सचिन सावंत, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री नसीम खान यांच्या नावांची चर्चा आहे. दरम्यान कॉंग्रेसमधून सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीला विरोध होऊ शकतो. कारण त्यांचे वडील डॉ. सुधीर तांबे हेही विधानपरिषदेवर आमदार आहेत. एकाच घरात २-२ आमदार आणि मामा मंत्री याच घराणेशाहीच्या समीकरणाचा फटका कॉंग्रेस आज भोगत आहे. सत्यजित तांबे स्वतःही समजदार असल्यामुळे पक्षाला नुकसान होईल, अशी भूमिका ते घेण्याची शक्यता कमीच आहे.

राष्ट्रवादीकडून सतराशे साठ उमेदवार इच्छुक असले तरी काही मोजक्याच लोकांची चर्चा आहे. त्यात सर्वात पहिले नाव एकनाथ खडसे यांचे असून त्या खालोखाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचेही नाव चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. तरीही त्यांच्या नावाचा विचार केला जात आहे. उत्तमराव जानकर, शिवाजीराव गर्जे, आदिती नलावडे, गायक आनंद शिंदे, श्रीराम शेटे यांचीही नवे विविध नेत्यांकडून सुचवली गेली असल्याने चर्चेत आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here