‘त्या’ शिवसेना खासदाराला मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी; ‘त्यांच्यावर’ केला आरोप, वाचा काय आहे प्रकरण

परभणी :

शिवसेनेचे जेष्ठ नेते व खासदार बंडू उर्फ संजय जाधव यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळे रात्री उशिराने स्वत: रात्री उशिरा खासदार जाधव यांनी पोलीस स्टेशन गाठत जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे. ‘’मला मारण्यासाठी परभणीतून दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे. नांदेडमधील एका मोठ्या टोळीने हा कट रचला असू शकतो’, असा अंदाज जाधव यांनी सांगितला आहे.

‘मला जीवे मारण्याची सुपारी देणारा व्यक्ती हा परभणीतील असावा’, असाही आरोप त्यांनी केला आहे. जाधव हे सध्या शिवसेनेत नाराज असल्याची चर्चा आहे. पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी सांगितले की, या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता नानलपेठ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

कोण आहेत जाधव आणि का आहेत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत :-

जाधव हे मागच्या लोकसभेला शिवसेनेकडून निवडून आले. दरम्यान काही दिवसांपूर्वी संजय जाधव यांनी नाराजीतून शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा पाठवला होता. परभणीत स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. राजकीय वाद चालू असताना, आपल्याच पक्षाचा राजीनामा पाठवला असताना जाधव यांच्या जीवावर उठलेला इसम नेमका कोण? याची सगळीकडे चर्चा चालू आहे.  

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here