हिरो मोटोकॉर्प आणि हार्ले डेव्हिडसनमध्ये झाला मोठा करार; वाचा, मार्केटवर होणार असा परिणाम

दिल्ली :

लॉकडाऊनच्या दरम्यान झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानामुळे हार्ले डेव्हिडसनने भारतातून आपला गाशा गुंडाळला असल्याचे वृत्त होते. दरम्यान गेल्या 4 वर्षात भारतीय बाजारातून काढता पाय घेणारी हार्ले ही 7 वी कंपनी ठरली. त्यांनतर भारतात हार्ले डेव्हिडसनची गाडी कशी खरेदी करता येणार, हा मोठा प्रश्न होता. आता तुम्हाला हार्ले डेव्हिडसनची गाडी हिरो कंपनी विकणार आहे.   

एवढेच नाही तर हार्ले डेव्हिडसनचीची सर्विस आणि पार्टससुद्धा हिरोच्या माधमातून विकले जाणार आहेत. हार्ले डेव्हिडसन आणि हिरो मोटोकॉर्प यांच्यात झालेल्या एका करारानुसार हिरो मोटोकॉर्प आता भारतीय मार्केटमध्ये हार्ले डेव्हिडसनच्या बाईक विकणार आहे. या दोन्ही कंपन्यांना एकमेकांचा फायदा होणार आहे तसेच हार्ले डेव्हिडसनच्या चाहत्यांसाठीही ही मोठी गोष्ट आहे.

असा होणार फायदा आणि परिणाम :-

१)      हिरो मोटोकॉर्पचं देशात असलेलं मोठं नेटवर्क हार्ले डेव्हिडसनला वापरता येईल.

२)      हार्ले डेव्हिडसनचं जगभरात असलेलं ब्रॅण्डनेमचा हिरोलाही फायदा होईल.

३)       हिरो मोटोकॉर्प ही जगातील सर्वात मोठी मोटारसायकल मेकर कंपनी आहे. या कंपनीने आतापर्यंत 9.5 कोटी मोटारसायकल आणि स्कूटर विकल्या आहेत. तब्बल 40 देशांमध्ये हिरोच्या मोटारसायकल विकल्या जातात. याचाही फायदा हार्लेला होणार आहे.

४)      एक ब्रॅण्ड असणारी तर दुसरी लोकांची मानसिकता ओळखून कमी पैशात टिकावू मोटर बनवनारी कंपनी एकत्र आल्याने त्याचा भारतीय मार्केटवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन एखादे नवे उत्पादन काढल्यास मोठा फटका इतर कंपन्यांना बसू शकतो.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here