सुवर्णसंधी : रेल्वेमध्ये भरती; फक्त होणार एक मुलाखत, मिळणार लाखांपर्यंत पगार

दिल्ली :

देशभरात नोकऱ्यांची वानवा असताना रेल्वेने देशातील तरुणांसाठी एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाच्या काळात लोकांवर आर्थिक संकट आहे. एका बाजूला पगारात हजारोंनी पगार कपात तसेच कर्मचारी कपात केली जात असताना युवकांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. उत्तर रेल्वेने उत्तर रेल्वेच्या मध्यवर्ती रुग्णालयात सीनियर रेसिडेन्सी योजनेत सीनियर रेजिडेंट पदासाठी पात्र उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. कुठलीही परीक्षा नाही,पूर्वपरीक्षा नाही फक्त एक मुलाखत पात्र झाल्यास तुम्हाला थेट नोकरी मिळणार आहे. विविध पदांवर नोकरीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी वॉक-इन मुलाखतीला येऊ शकतात.

अशी होणार निवड :-

आधी उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी होईल. आणि मगच उमेदवारांची निवड वॉक-इन-मुलाखतीच्या आधारे होईल.

मुलाखतीची तारीख – 5 नोव्हेंबर आणि 6 नोव्हेंबर
वेळ – सकाळी 8.30 ते 11 वाजेपर्यंत
पत्ता- ऑडिटोरियम, पहिला मजला, शैक्षणिक ब्लॉक, उत्तर रेल्वे मध्यवर्ती रुग्णालय, नवी दिल्ली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here