सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे संतप्त शेतकऱ्याने जाळले सोयाबीन; वाचा, काय घडला प्रकार

यवतमाळ :

परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अशातच सरकारने मदत कली असली तरी ती मदत तुटपुंजी असल्याचा दावा विरोधीपक्षाने केलेला आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला तुमच्या तालुक्याला मदत जाहीर झालेली नाही. तुमचा तालुका या निकषात बसत नसल्यामुळे तुम्हाला नुकसान भरपाईमिळणार नाही, सांगण्यात आले. परिणामी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांने अक्षरशः निषेध व्यक्त करीत आपल्या शेतातील सोयाबीन पेटवून दिले.

अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान आणि प्रशासनाने वर केलेले हात यामुळे एका शेतकऱ्याला पै पै जमा करून आपलं पिक जाळावं लागलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यातील महागावचे मनीष जाधव यांनी पावसाने उसंत घेतल्याने त्यांनी सोयाबीन सोंगणीस सुरवात केली. मात्र परतीच्या पावसाने घोळ केला. पिकाचं नुकसान झालं. यानंतर जाधव यांनी सोयाबीनच्या नुकसानीची कल्पना अधिकाऱ्यांना दिली असता सरकारी निकषात आपला तालुका बसत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशावेळी जाधव यांनी निषेधाचा मार्ग म्हणून थेट पिक जाळले आहे. फक्त जाधवच नाही तर त्यांच्या आसपासच्या शेतकऱ्यांचेही परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान स्थानिक शेतकरी सरकारी निकष बदलून शेतकऱ्यांना सरसकट मदतीची मागणी करत आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here