दिवाळीत ‘या’ अ‍ॅपवरून अवघ्या 1 रुपयांत खरेदी करू शकता सोनं; वाचा, काय आहे विषय

मुंबई :

सोने खरेदीसाठी आपण थेट दुकानात जातो, पूर्ण किंमत देतो आणि मग सोने घेऊन येतो. भारतपेने मर्चेंट्ससाठी ही सुविधा सेफगोल्डसह उपलब्ध केली आहे. हा एक असा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. जिथे तुम्हाला जास्त खटपट न करता सोने खरेदी करता येईल. या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांना 24 तास लो तिकिट साइजवर 24 कॅरेट फिजिकल गोल्डची खरेदी, विक्री आणि डिलिव्हरीची सुविधा दिली जाणार आहे.

विशेष गोष्ट म्हणजे आता मात्र भारतपे या अ‍ॅपवरून तुम्ही फक्त १ रुपयात सोने खरेदी करू शकता. भारतपे न दिलेल्या माहितीनुसार तुम्ही त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कधीही, कुठूनही 99.5 टक्के 24 कॅरेट सोनं खरेदी आणि विक्री करू शकता. किंमत किंवा वजनाच्या हिशोबाने सोन्याच्या खरेदीचा व्यापार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. 

या प्लॅटफॉर्मवर गोल्ड लाँच करण्यासाठी अनेक ग्राहक आग्रही होते. त्यानंतर आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल गोल्ड प्रोडक्ट लाँच केलं. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लाँचिंगच्याच दिवशी 200 ग्रॅम सोन्याची विक्री करण्यात आली. या प्लॅटफॉर्मवर हळू-हळू नवे फीचर्स जोडले जाणार असून आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 30 किलो सोनं विकण्याचं लक्ष आहे, अशी माहिती भारतपे ग्रुपचे अध्यक्ष सुहेल समीर यांनी दिली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here