आपले ‘हे’ ATM कार्ड वाईट काळात देईल साथ; वाचा, कसा होईल मोठा फायदा

दिल्ली :

कोरोनावर आता काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आले असले तरी आर्थिक संकटातून मात्र अद्यापही लोक सावरलेले नाहीत. अशातच दिवाळीचा सण आपल्या समोर असताना खर्च करायचा कसा?, असा प्रश्न लोकांसमोर आहे. मात्र आता टेन्शन घ्यायचे काम नाही. आपले जनधन खाते असेल तर उत्तम नाहीतर जनधन खाते खोला, सणासुदीच्या काळात खाती उघडणार्‍या लाखो ग्राहकांना मोठ्या ऑफर दिल्या जात आहेत.

एटीएम कार्डची ऑफर देणारी कंपनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने रूपे फेस्टिव्ह कार्निवल सुरू केली आहे. यात एटीएम कार्डधारकांना विशेष लाभ देण्यात येणार आहे.  

अशा आहेत भन्नाट आणि जबरदस्त ऑफर्स :-

  • ई-कॉमर्स शॉपिंगवर रुपे फेस्टिव्ह कार्निवलवर शिक्षणावरील सवलत मिळत आहे.
  •  Myntra ला 10 टक्के सूट मिळेल.
  • टेस्टबुक डॉटकॉमच्या टेस्ट पासवर 65% सवलत मिळेल.
  • सॅमसंगचे टीव्ही, एसी आणि स्मार्टफोनमध्ये 52 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.
  • बाटावर 25 टक्के सूट देण्यात येणार आहे.
  • पी अँड जी उत्पादनास 30 टक्के सूट मिळत आहे.

आता एवढ्या जबरदस्त ऑफर्स असतानाही ईतरही अनेक छोटमोठ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. भोजन, फूड डिलीव्हरी, खरेदी, करमणूक, निरोगीपणा आणि फार्मसी यासारख्या इतर वस्तू, उत्पादने आणि सेवांमध्ये ऑफरसह तुम्ही भरघोस खरेदी करू शकता. 

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here