म्हणून आपटले कांद्याचे भाव; पहा महाराष्ट्रातील आजचे बाजारभाव

कांद्याच्या साठवणुकीची मर्यादा घालून दिल्याने व्यापाऱ्यांनी यावर आपला निषेध व्यक्त करीत बाजार व्यवहार बंद ठेवल्याचा फटका बसण्यास सुरुवात झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार बंद असल्याने काही भागात बाजार स्थिर राहिले, तर काही भागात २०० ते ४५० रुपये क्विंटल इतक्याने घाव घटले.

कोल्हापूरमध्ये बाजारात सरासरीमध्ये १५० रुपये घट झाली, तर सोलापुरात ३०० रुपये इतकी घट झालेली आहे. मुंबईत मात्र याचा काहीही परिणाम जाणवलेला नाही. एकूणच बाजारातील अनिश्चिततेच्या गर्तेचा हा किरकोळ परिणाम आहे. मात्र, पुढील काळात एकूण आवक आणि मागणी लक्षात घेता कांद्याचे भाव वाढतील असेच चित्र आहे. केंद्र सरकारने यापूर्वी खरेदि केलेला कांदा बाजारात आणल्यास भाव वरच्या टप्प्यावर जाऊन स्थिरावतील असेच चित्र आहे.

मंगळवार (दि. २७ ऑक्टोबर २०२०) रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

बाजार समिती आवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर1733200055004000
औरंगाबाद471100050003000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट5488500070006000
श्रीगोंदा- चिंभळे128550060005500
सातारा66200060004000
नांदूरा11100040004000
जुन्नर -आळेफाटा3322301080106010
कराड117350065006500
कल्याण3750080007750
सोलापूर541110065002000
जळगाव952137545753100
पंढरपूर75050065003500
नागपूर2250400060005500
सांगली -फळे भाजीपाला560100055003200
पुणे6385100065003750
पुणे- खडकी4360060004300
पुणे -पिंपरी1500050005000
पुणे-मांजरी41210045004000
पुणे-मोशी124300055004250
मलकापूर89292543003425
वाई20250050003750
कल्याण3600070006500
कल्याण3400060005000
नागपूर52400060005500
नाशिक293256056004750
राहूरी472150060005000
मनमाड15369936993699
राहता857100051003950

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here