असा बनवा ‘स्पेशल पुलाव’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

पुलावचा हा एक नवा प्रकार आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. अंडा पुलाव, लेअर पुलाव आणि अजून काही पदार्थ एकत्र करून आम्ही हा ‘स्पेशल पुलाव’ बनवला आहे. या रेसिपीत अंडा पुलाव किंवा अंडा बिर्याणीचाही झटका जाणवेल. नक्कीच ट्राय करा.

साहित्य घ्या मंडळीहो…

  1. 1 कप शिजवलेला बासमती तांदूळ
  2. 4 उकडलेली अंडी
  3. 1 वाटी लसूण-खोबरं-कांदा मसाला (८-१० लसूण पाकळ्या + २ कांदे + १/४ वाटी किसलेले सुकं खोबरं)
  4. 3 टेबल स्पून तेल
  5. 2 टी स्पून गरम मसाला
  6. 2 टी स्पून लाल तिखट
  7. 1/2 टी स्पून धणे-जीरे पावडर
  8. चवीनुसार मीठ

हे साहित्य घेतले असेल तर करा की बनवायला सुरुवात…

  1. प्रथम एका भांड्यात तेल गरम करुन त्यात लसूण-खोबरं-कांदा मसाला, लाल तिखट, गरम मसाला, धणे-जीरे पावडर आणि मीठ घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. मग त्यात उकडलेल्या अंड्याचे उभे चिरलेले तुकडे घालून हलक्या हाताने परतावे.
  2. अंडी घालून परतलेल्या मसाल्यात शिजवलेला बासमती तांदूळ घालून मिक्स करुन एक वाफ घ्यावी. मग गॅस बंद करुन डिश मधे पुलाव सर्व्ह करावा.

संपादन : संचिता कदम  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here