अशी बनवा मस्त आणि टेस्टी ‘इडली चिल्ली’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

आपल्याकडे नाश्त्याला खूप सारे पदार्थ केले जातात. कांदेपोहे, उपमा, थालीपीठ, आप्पे, डोसा, इडलीअसे कित्येक पदार्थ आपण नाश्त्यात खात असतो. आपण इडली करतो. विविध कारणांमुळे इडली जास्त होते. मग बऱ्याचवेळा ती उरते मग पुन्हा तीच इडली चटणी-सांबर सोबत खाणे नको वाटते. अशावेळी त्या इडलीचे काय करायचे हा प्रश्न असतो. आपण त्याची इडली चिल्ली करू शकतो. उरलेली इडली हवाबंद डब्यात ठेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला ही रेसिपी करून बघा. कशी पटापट फस्त होते. आणि उरलेल्या इडलीमुळे दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्याचा प्रश्न पण सुटेल.

साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 10-12 इडली
 • 1/3 कप सिमला मिरची उभी चिरून
 • 1/3 कप गाजर बारीक चिरून
 • 1/3 कप कांद्याची पात
 • 1/3 कप कांदा चिरलेला
 • 1/2 टीस्पून आल्याचे बारिक तुकडे
 • 1/2 टीस्पून लसूण बारिक तुकडे करून
 • 2 हिरव्या मिरच्या
 • 1/2 टीस्पून सोया सॉस
 • 1/2 टीस्पून रेड चिली सॉस
 • 1/2 टीस्पून ग्रीन चिली सॉस
 • 1/3 टीस्पून व्हिनेगर
 • 1 टीस्पून शेजवान सॉस
 • 1 कप कॉर्नफ्लोअरची स्लरी (थोडा लाल मसाला आणि मिठ टाकुन)
 • 1 कप तेल

कृती अगदीच सोपी आहे. सहजपणे तयार होईल इडली चिल्ली

 1. इडलीचे उभे तुकडे करून घ्या. एका इडलीचे 3-4 तुकडे होतात. त्यानंतर कढईत तेल गरम करत ठेवा. तोपर्यंत कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घ्या.
 2. तेल चांगलं तापलं की इडलीचे तुकडे स्लरीमध्ये बुडवून तेलात सोडा. गोल्डन होईपर्यंत भाजून घ्या. मग एका प्लेट मध्ये कडून त्याच तेलात (तेल जास्त असेल तर कमी करा.) कांद्याची पात सोडून बाकी सगळ्या भाज्या टाकून 2 मिनिटे परतवा.
 3. आता त्यात सगळे सॉस आणि व्हिनेगर टाकून मिक्स करा. हे सर्व करताना गॅस फ्लेम मोठी ठेवा. सॉस मध्ये मीठ असते म्हणून मी टाकले नाही. तुम्हाला कमी वाटत असेल तर टाकू शकता.
 4. आता फ्राय इडली टाकून छान 5 मिनिटे परतवा. 5 मिनिटानंतर गॅस बंद करून वरून कांद्याची पात टाकून गरमागरम सर्व्ह करा

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here