सरकारी नोकरीची सुवर्णसंधी : केंद्र सरकार करत आहे ‘या’ पदांसाठी भरती, वेतन आहे ५० हजारांपेक्षा जास्त

दिल्ली :

सध्या जगभरात लोकांवर आर्थिक संकट आलेले आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात झाली आहे. उद्योग–धंदे करणारे छोटमोठे व्यावसायिकही अडचणीत आहेत. एकूण जगभरात अशी परिस्थिती असताना केंद्र सरकारने एक मोठी सुवर्णसंधी आणली आहे. डिप्लोमा, सामान्य पदवीधर ते अभियंते व डॉक्टरांपर्यंत विविध शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सर्वोत्तम संधी आहे.

ऑयल इंडिया या भारत सरकारच्या कंपनीमध्ये ५० हजार ते २ लाख मासिक पगार असणारी नोकरी उपलब्ध झालेली आहे.  

या पदांसाठी आहे भरती :-

मानसोपचारतज्ज्ञ
कॉन्फिडेन्शियल सेक्रेटरी
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
वरिष्ठ सुरक्षा अधिकारी
वरिष्ठ अधिकारी (विद्युत)
वरिष्ठ अधिकारी (मनुष्यबळ)
वरिष्ठ अधिकारी (लीगल)
वरिष्ठ अधिकारी (मेकॅनिकल)
वरिष्ठ अधिकारी (इन्स्ट्रूमेंटेशन)
वरिष्ठ अधिकारी (जिओफिजिक्स)
वरिष्ठ अधिकारी (जलाशय)
सुपरिटेंडिंग इंजिनीअर
व्यवस्थापक (लेखा)
अधीक्षक वैद्यकीय अधिकारी (ईएनटी)
अधीक्षक वैद्यकीय अधिकारी (पॅथॉलॉजी)
अधीक्षक वैद्यकीय अधिकारी (ऑप्थॅल्मोलॉजी)
अधीक्षक वैद्यकीय अधिकारी (ऑर्थोपेडिक सर्जन)
अधीक्षक वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजी)
सुपरीटेन्डिंग मेडिकल ऑफिसर (फिजिशियन)

असा कराला अर्ज :-
Oil India Vacancy 2020 या लिंकवरून तुम्ही थेट कंपनीच्या वेबसाईटवर जाल. तिथे अर्ज भरा.

अशी आहे अर्ज भरण्याची मुदत आणि शुल्क :- सामान्य, ओबीसी, एनसीएल प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ५०० रुपये आहे. अन्य सर्व प्रवर्गांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. अर्ज प्रक्रिया १ ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० ऑक्टोबर आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here