बघा कसा आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पाऊस; हसा चकटफू

नाशिकचा पाऊस :- दरोडेखोर आहे
एकदा पडला तर अख्खा सराफ बाजार आणि भांडी बाजार लुटून नेतो 

विदर्भाचा पाऊस :-
एका प्रेयसीसारखा……
सारखी वाट पहायला लावणार
वेळ कधीच नाही पाळणार…..
आला तर प्रेयसीसारखा
झुळूक दाखऊन भरsकन जाणार
अन् पुन्हा वाट पहायला लावणार….

मराठवाड्यातला पाऊस म्हणजे लफडं…! जमलं तर जमलं नाहीतर साराच हुकल…!! 

कोकण चा पाऊस :-
लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा
एकदा सुरवात झाली की शेवट पर्यंत धो धो धो धो धो धो पडतो …

अन मुंबईचा पाऊस :-
प्रेयसीच्या बापा व भावा सारखा ..
कधी येऊन टपकल
धो धो आपल्याला धुउन  निघून जाईल सांगता येत नाही 

पुण्याचा पाऊस बायकांसारखा :- त्या चिडल्या कि धड स्पष्ट बोलत नाहीत. नुसती दिवसभर पिरपिर चालु. पाऊस पण धड रपरपा पडत नाही. दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालु असते. नुसता वैताग!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here