शरद पवार खरं बोलतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘तेव्हा’ कळेल; ‘त्यावरून’ नगरमध्ये सुरु झाला वाद

अहमदनगर :

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेत अहमदनगरमधील के. के. रेंज विस्तारीकरणाबाबतचा प्रश्न मार्गी लावला. पण आता नगरमध्ये त्यावरून संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. त्यावरुन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. ‘के के रेंज संदर्भात विस्तारीकरण होणार की नाही हे निवडणुकीआधी कळेल. त्यामुळे पवार साहेबांवर विश्वास ठेवायचा का मोदी साहेबांवर? याचा निर्णय जनतेने घ्यायचा आहे’, असं वक्तव्य खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.

याच पार्श्वभूमीवर ‘सुजय विखे हे भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे मंत्रालयात काय शिजतंय हे त्यांनी स्पष्ट करावं,’ असा टोला राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लगावला आहे. पुढे बोलताना तनपुरे यांनी म्हटले की, आम्ही जमीन अधिग्रहण करणार नाही, असे संरक्षण खात्याच्या प्रतिनिधींनी येऊन सांगितलं आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही. याबाबत कोण काय बोलतं यात मला देणेघेणे नाही. जी काही वस्तूस्थिती आहे ती मी तुम्हाला सांगितली आहे. जर यात अजून काही असेल तर सुजय विखे हे भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे मंत्रालयात काय शिजतंय हे त्यांनी स्पष्ट करावं.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here