‘या’ बँकेत नोकरीची संधी; आजपासून करता येणार अर्ज

कोरोनाच्या काळात लोकांवर आर्थिक संकट आहे. एका बाजूला हजारोंनी पगार कपात तसेच कर्मचारी कपात केली जात असताना युवकांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यूको बँकने स्केल-1 आणि स्केल-2 साठी स्पेशलिस्ट अधिकारी पदांबाबत भरवायची असल्याबाबत माहिती दिली आहे.

इथे करा अर्ज :-

अधिकृत वेबसाईटद्वारे https://www.ucobank.com इथे ऑनलाईन अर्ज करू शकतात.

गरजू आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवार आजपासून अर्ज भरू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2020 आहे. परीक्षेची तारीख डिसेंबर 2020 ते जानेवारी 2021पर्यंत असेल.  

परीक्षेच्या कॉल लेटरविषयी महत्वाचे :-

उमेदवारांना लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूसाठी आपला रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि जन्म तारीख टाकून कॉल लेटर डाउनलोड करावं लागेल. पोस्टाद्वारे कोणतीही हार्ड कॉपी पाठवली जाणार नाही.

या पदांसाठी होणार परीक्षा :-

इंजीनियर

इकोनॉमिस्ट

स्टेटिस्टिशियन

आयटी ऑफिसर

चार्टर्ड अकाउंटेंट (JMGS-I)

चार्टर्ड अकाउंटेंट (MMGS-II)

सिक्योरिटी ऑफिसर

अशी असेल फी :-

जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांना एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना शंभर रुपये ऍप्लिकेशन फी भरावी लागणार आहे. अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने फी पेमेंट करावं लागणार आहे. ऑनलाईन पेमेंटशिवाय इतर कोणत्याही पद्धतीने पेमेंट स्वीकारलं जाणार नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here