हिंदुत्वावरून शिवसेनेचे खडे बोल; ‘त्याचे’ तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी स्वागत केले, पण

मुंबई :

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात काल झालेल्या दसरा मेळाव्यात मांडलेले मुद्दे आणि त्या अनुषंगाने येणारे विषय यावर भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन झाले, त्या सोहळय़ास सरसंघचालक मोहन भागवत विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. अयोध्येत राममंदिर व्हावे ही संघाची भूमिका होतीच, पण ‘कोरोना’ महामारीची पर्वा न करता सर्व मंदिरे खुली करा, असे श्री. भागवत कधीच सांगणार नाहीत. मंदिरांत गर्दी झाली तर महामारीचे संकट वाढेल असा विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणाऱ्यांपैकी सरसंघचालक आहेत. घंटा बडवून, थाळ्या वाजवून कोरोना पळून जाणार नाही. त्यासाठी आरोग्यविषयक कठोर नियम-शिस्तीचे पालन करावेच लागेल, लसीवर संशोधन करावेच लागेल असे मानणारे सरसंघचालक आहेत. भारतीय जनता पक्षाचे जे लोक मंदिरासाठी थाळ्या बडवत आहेत व छाती पिटत आहेत त्यांनी सरसंघचालकांकडून हिंदुत्वाचे धडे घ्यायला हवेत.

”आमच्यासाठी ‘हिंदुत्व’ हा शब्द आपल्या प्रथापरंपरांवर आधारित मूल्य पद्धतीचा आहे. त्यामुळेच या व्याख्येत 130 कोटी भारतीय येतात. आम्ही व्यापक अर्थाने हिंदुत्वाकडे पाहतो” हे श्री. भागवतांचे विधान आजच्या स्थितीत महत्त्वाचे आहे. हिंदुत्व हा हिंदू समाजाची एकात्मता दाखविणारा शब्द आहे. तो शब्द हिंदुस्थानातील बहुसंख्य समाजाचे राष्ट्रीयत्व दर्शवितो. त्याचा आणि धर्मनिरपेक्षतेचा पुठल्याही प्रकारे संबंध येत नाही. निधार्मिकतेचा संबंध शासन संस्थेशी असतो आणि आजपर्यंतचे सर्व हिंदू शासक व शासन संस्था निधर्मीच होते. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेच.

हिंदुत्वाची व्याख्या आज कधी नव्हे इतकी संपुचित झाली आहे. बलात्कार, खून यांसारख्या प्रकारांतही अनेकांना हिंदुत्व दिसू लागले तेव्हा धक्काच बसतो. उत्तर प्रदेशात परवानगीशिवाय दाढी ठेवली या कारणाखाली एका पोलीस फौजदाराला सरकारने निलंबित केले. त्याचे तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी स्वागत केले, पण राजकारणात, पेंद्रीय मंत्रिमंडळात अनेकांनी दाढी अभिमानाने ठेवलीच आहे. हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही. चापेकर बंधूंना दाढी नव्हतीच, पण तीनही चापेकर बंधू हसत हसत देशासाठी फासावर गेले. अशा मर्दानगीची अनेक उदाहरणे आहेत. सरसंघचालक व शिवसेना पक्षप्रमुखांची भाषणे हिंदुत्वाला व राष्ट्रीय ऐक्याला दिशा देणारीच होती. नागपुरात आणि मुंबईतील वीर सावरकर स्मारक सभागृहात दसऱ्याच्या निमित्ताने हिंदुत्वावर मंथन झाले. दोन्ही नेत्यांचे अभिनंदन!

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here