केंद्र सरकारच्या या योजनेतून मिळतंय ‘विनातारण’ 10 हजारांपर्यंतचे कर्ज; असा करा अर्ज

दिल्ली :

केंद्र सरकार देशातील सामान्य जनतेसाठी विविध योजना आणत असते. कोरोनाच्या काळात आलेल्या आर्थिक संकटामुळे भारतातील सामान्य जनतेचे कंबरडे मोडले. आर्थिक गर्तेत सापडलेल्या सामान्य लोकांसाठी केंद्र सरकारची ‘पंतप्रधान स्वानिधी योजना’ ही योजना फायदेशीर ठरत आहे.

या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलीही वस्तू तारण न ठेवता हे कर्ज मिळणार आहे. या योजनेंतर्गत पथ विक्रेत्यांना 10 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. जे लोक रस्त्यावर दुकानं थाटून आणि कामधंदा करून उपजीविका चालवतात, अशा लोकांसाठी ही योजना खास लाभदायी ठरत आहे. सरकार अशा गरजूंना पुन्हा व्यवसाय करण्यासाठी कर्ज देत आहे. हे कर्ज परवडणार्‍या दरावर उपलब्ध होत आहे.

असा करा अर्ज :-

  • दुकानदाराने प्रथम सरकारी योजनेच्या अधिकृत वेबसाइट http://pmsvanidhi.mohua.gov.in/ वर भेट दिली पाहिजे.
  • वेबसाइटच्या पहिल्या पानावर ‘कर्जासाठी अर्ज करण्याची योजना?’ चा पर्याय दिसेल.
  • अर्जदाराने ते काळजीपूर्वक वाचले पाहिजे. यानंतर ‘व्ह्यू मोअर’ या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर अर्जदाराला ‘व्ह्यू / डाऊनलोड फॉर्म’ वर क्लिक करावे लागेल, त्यानंतर फॉर्म कर्ज योजनेसाठी उघडेल.
  • तो फॉर्म डाऊनलोड करावा आणि त्यानंतर भरावा, सर्व आवश्यक कागदपत्रांसह तो फॉर्म शासकीय अधिकृत कार्यालयात जमा करावा लागेल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here