सर्वसामान्यांच्या खिशाला झटका! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होणार ‘एवढी’ वाढ

मुंबई :

कोरोनामुळे जगभरात आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. शेअर मार्केट, सोने, इंधनांचे दर कधी कमी तर कधी जास्त होत आहेत. एकूणच काय तर आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे. अशातच सर्वसामान्यांना खिशाला झटका देणारी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार पुन्हा एका पेट्रोल-डिझेलवर एक्साइज ड्यूटी वाढवण्याच्या तयारीत आहे. 3 ते 6 रुपये प्रति लीटरपर्यंत एक्साइज ड्यूटी वाढवली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान लॉकडाऊनच्या काळात सातत्याने पेट्रोल-डीझेलच्या दरात वाढ होत होती. पेट्रोल डिझेलच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ लक्षात घेता 50 पैसे पेट्रोलच्या दरात वाढ झाली म्हणून आंदोलन करणारे आज सत्ताधारी सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे 2014 पूर्वीच्या किमती आणि आतच्या किमती लक्षात घेणे गरजेचे आहे. मे 2014 मध्ये पेट्रोलवर एकूण टॅक्स 9.48 रुपये प्रति लीटर आणि डिझेलवर 3.56 रुपये प्रति लीटर होता. तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोलवरील टॅक्स वाढून 32.98 प्रति लीटर आणि डिझेलवरील टॅक्स 31.83 रुपये प्रति लीटर झाला आहे.  

जगात क्रूड ओईल स्वस्त होत आहे म्हणून पेट्रोल आणि डीझेलही स्वस्त होत आहे. जगभरात पेट्रोल-डीझेलचे भाव कमी होत असताना भारतात मात्र केंद्र आणि राज्य सरकारांद्वारा सतत टॅक्स वाढवला जात आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here