आरोग्यासाठी असे फायदेशीर आहे अंजीर; जाणून घ्या फायदे

अंजीर ही असे फळ आहे ज्याची पाने सुद्धा गुणकारी आहेत. अंजीर तसे प्रामुख्याने दोन प्रकारात मोडते व दोन्हीही प्रकार मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात कारण अनेक डॉक्टर हे खाण्याचा सल्ला देत असतात. एक ताजे अंजीर असते व दुसरे सुकविलेले अंजीर असते. आहारतज्ञ सुध्दा अंजीर हे तुमच्या आहारात नेहमी असायला हवे असा आग्रह धरत असतात. 

जाणून घेऊ अंजीर खाण्याचे फायदे :-
1) रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास अंजीर मदत करते.

2) सांधेदुखी, हाडांशी निगडीत व्याधी असणाऱ्यांनी सेवन करावे. अंजीरमधील कॅल्शियम हाडे ठिसूळ होऊ देत नाही. 

3) अंजिराचे पाने उकळून प्यायल्यास चरबी वर नियंत्रण ठेवता येते.

4) अंजिरमध्ये असणाऱ्या फायबरमुळे पचनशक्ती चांगली होते. ज्यांना वजन वाढवायचे त्यांनी अंजीर खावे व ज्यांना कमी करायचे त्यांनीही खावे फक्त खाण्याच्या पध्दती समजून घ्या.  

5) ज्यांना वजन वाढवायचे असेल, त्यांनी अंजीरे दुधामध्ये भिजवून खावीत.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here