व्यायामाच्या माध्यमातून होतात गुडघेदुखीवर उपचार; वाचा, काय आहे प्रकार

गुडघेदुखी हा सध्या घराघरात असलेला आजार आहे. व्यक्तीनुसार गुडघेदुखीची कारणे बदलतात. कुणी शेतात राबल्यानं, कुणी जाड असल्याने तर कुणाला व्यायामाच्या अभावाने गुडघेदुखी सुरू होते. गुडघेदुखीवर अनेक औषधेही आलेली आहेत. मात्र त्याचा तेवढ्यापुरता फरक पडतो. म्हणूनच आज आम्ही आपल्याला व्यायामाचा वापर करून गुडघेदुखीवर कशी मात करता येईल, याविषयी सांगणार आहोत.

हे आहेत उपाय :
पायाचा व्यायाम : खुर्चीच्या आधाराने उभे राहा आणि दोन्ही पाय एकाआड एक १६ आकडे मनात मोजत हळुवारपणे हलवा.
पाय सरळ करणे : पाठीवर झोपून पाय वर- खाली करा. या वेळी गुडघा सरळ ठेवा.
गुडघ्यांवर दाब देणे : तळहात किंवा टॉवेल गुडघ्याच्या खाली ठेवा. मनात दहापर्यंत आकडे मोजत गुडघा तीन वेळा हळुवारपणे दाबा.
बसून व्यायाम : उंच खुर्चीवर बसा आणि पाय हळुवार पद्धतीने गुडघ्यापासून वर- खाली करा.
उशीचा व्यायाम : खुर्चीवर मांडीखाली उशी घेऊन बसा आणि मांडीवर दाब द्या. हळुवारपणे मनात १६ पर्यंत आकडे मोजत दाब कमी करा.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here