अशी बनवा झणझणीत ‘पनीर चिल्ली’; रेसिपी वाचा एका क्लिकवर

पनीरच्या विविध भाज्या आपण खात असतो. पनीर चिल्ली तर सर्वांचाच फेव्हरेट पदार्थ आहे. बहुतांश वेळा पनीर चिल्ली आपण हॉटेलमध्ये खातो मात्र जेव्हा आपण घरी बनवतो तेव्हा हॉटेलसारखी होत नाही. आज आम्ही आपल्याला अगदी हॉटेलसारखी पनीर चिल्ली कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :-

 1. 200 ग्रॅम पनीर
 2. 1 कॅप्सिकम मोठी साईज मध्ये कटिंग
 3. पत्ताकोबी दोन टेबलस्पून लांब चिरलेली
 4. थोडीशी कांद्याची पात
 5. 1 टेबल फोन गाजर लांब शिरलेले
 6. चिली सॉस, सोया सॉस,रेड चिली सॉस, आवडीनुसार
 7. स्वादानुसार मीठ
 8. 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर
 9. 2 टेबलस्पून टोमॅटो केचप
 10. 2 इंच अद्रकचा किस
 11. हिरवी मिरचीची पेस्ट आवडीनुसार
 12. फोडणीसाठी आणि तळण्यासाठी तेल
 13. टिस्पून लाल तिखट

साहित्य घेतलं का? मग वाट कसली बघताय… लागा की बनवायला…

 1. सर्वप्रथम एक कढई गरम करून त्यामध्ये किसलेला अद्रक, हिरवी मिरची टाकून परतून घ्या.
 2. नंतर कॅप्सिकम पत्ताकोबी गाजर व्यवस्थित परतून घ्या, त्यानंतर त्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो केचप, थोडेसे मीठ, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून परतून घ्या.
 3. त्यानंतर पनीर मध्ये एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून थोडेसे पाणी टाकून मॅरिनेट करून घ्या. तेलामध्ये तळून घ्या. पनीर हे ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्या.
 4. एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर मध्ये पाणी करून एक पातळशी पेस्ट तयार करून ती ग्रेव्ही मध्ये ऍड करा दोन मिनिटापर्यंत शिजू द्या (ॲडिशनल आहे विनेगर पाहिजे असेल तर थोडेसे टाका)
 5. आपली पनीर चिल्ली तय्यार…

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here