अशी बिस्किटांची चवदार बर्फी; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

आजवर तुम्ही अनेक प्रकारच्या बर्फी खाल्ल्या असतील. तसेच तुम्ही बिस्कीटपासून बनणारे अनेक पदार्थही खाल्ले असतील. आज आम्ही तुम्हाला बिस्कीटपासून बर्फी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आता बर्फी तुम्ही घरीही बनवू शकता

साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 4 छोटे टायगर गुलकोज बिस्कीटपुडे
 2. गरजेप्रमाणे दुध
 3. 2 चमचे गरजेप्रमाणे ड्रायफूट काजू, बदाम, पिस्ता
 4. 2 चमचे कोको पावडर
 5. 4 चमचे डेसिकेटेड कोकोनट
 6. 1/4 लिक्विड व्हाईट चॉकलेट

साहित्य घेतले असेल तर बनवायलाही घ्या की….

 1. प्रथम सर्व बिस्किटांची मिक्सरवर पुड करून घेतली
 2. नंतर डेसिकेटेड कोकोनट घेऊन त्यामध्ये व्हाईट चॉकलेट मेल करून मिक्स केले. बिस्किटांच्या मिश्रणाचे दोन भाग केले.
 3. बिस्किटाच्या मिश्रणाचे दोन भाग केले एका भागामध्ये कोको पावडर मिक्स करून दूध टाकून त्याचा गोळा बनवला. दुसऱ्या भागामध्ये दुध टाकून त्याचा पण गोळा बनवला.
 4. बिस्किटांचा एक भाग बटर पेपरवर पसरवून घेतला त्यावर डेसिकेटेड कोकोनट हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतले
 5. नंतर त्यावर तिसरा लेयर पसरवून घेतला आणि त्यावर ड्रायफूट पसरवून घेतले
 6. याप्रकारे सगळे लेअर पसरून झाल्यानंतर त्यावर ड्रायफूट टाकले आणि त्याचे पीस कट केले.

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here