धक्कादायक : अमेरिकेत वर्णद्वेषाचा बिर्लांच्या मुलीला बसला फटका; कुटुंबाला रेस्टॉरंटमधून हाकलले

न्यूयॉर्क :

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांच्या कुटुंबालाही अमेरिकेत वर्णद्वेषाचा फटका बसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्ला ही प्रसिद्ध गायिका आहे. नुकतीच ती अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील एका प्रसिद्ध सेलिब्रिटी रेस्टॉरंटमध्ये गेली असता या रेस्टॉरंटमधून तिची आई, भावासह सर्वांना बाहेर काढण्यात आले.

विशेष म्हणजे अनन्याने ही माहिती स्वतः ट्वीटर वर सांगितली आहे. तिने म्हटले की, हे रेस्टॉरंट घोर वर्णद्वेषी आहे. आमच्यासोबत त्यांची वागणूक अत्यंत हीन होती. हे ठीक नाही झाले.

या रेस्टॉरंटचे नाव स्कोपा असे असून ते कॅलिफोर्नियात आहे. इटली-अमेरिकन रेस्टरॉ सेलिब्रिटी शेफ अँटोनिओ लोफासा यांच्या मालकीचे हे रेस्टॉरंट आहे. अनन्य़ाने थेट रेस्टॉरंटचा मालक अँटोनिओला ट्विट करत सांगितले की, आम्हाला जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये तीन तास वाट पहावी लागली. इथे माझ्या आईला एका वेटरने वाईट वागणूक दिली. तसेच वर्णद्वेशी टीका केली

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here