बाजारात आली तेजी; ‘या’ कंपन्यांनी पगार केले पूर्वतत, तसेच पगारवाढीचाही विचार

मुंबई :

कोरोनामुळे आर्थिक जगतावर मोठे संकट होते. अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी पगार कपात केली होती. तसेच काही कंपन्यांनी तर कामगार कपातही केली होती. त्यामुळे ही दिवाळी सुनी सुनी जाणार, असे चित्र समोर दिसत होते. मात्र आता एक मोठी बातमी आहे रिलायन्ससह टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल आणि माईंडट्री यांसारख्या अनेक टॉपच्या आयटी कंपन्यांनी पगारकपात मागे घेतली आहे. तसेच यातील काही कंपन्यांनी तर पगारवाढही जाहीर केली आहे.

मुकेश अंबानी यांनी कोरोनाकाळातही व्यवसाय वाढवून दाखवला. उद्योग जगतात मोठी मजलही मारली. परिणामी रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये काही विभागांनी कर्मचाऱ्यांचे कमी केलेले पगार पूर्ववत केले आहेत. एवढेच नाहीतर रिलायन्सने लॉकडाउनच्या काळात चांगल काम करणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना रिलायन्सकडून परफॉर्मन्स बोनसही देण्यात येणार आहे.  ज्या कर्मचाऱ्यांनी करोनाच्या काळात काम केले अशा लाखो कर्मचाऱ्यांना सद्भावना म्हणून ही रक्कम देण्यात येणार आहे.

दैनिक प्रभातने एका इंग्रजी वृत्तपत्राच्या हवाल्याने सांगितले की, गेल्या तीन आठवडयांपासून टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल आणि माईंडट्री यांसारख्या अनेक टॉपच्या आयटी कंपन्यांनी नवी पगारवाढ जाहीर केली आहे. तसेच सणांच्या काळात बोनसही देणार असल्याचे म्हटले आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here