‘या’ भाजप नेत्याचा सवाल; मग ‘ती’ हिंमत मविआच्या मंत्र्यांनी का दाखवली नाही?

मुंबई :

कोरोनाचे प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला तरीही अद्याप पूर्ण नियंत्रण मिळालेले नाही. अशातच गेल्या २ दिवसात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे ते सरकारी इस्पितळात दाखल आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारी हॉस्पिटल्स अप्रतिम असतील तर मग कोरोनाची लागण झालेल्या १६ पैकी एकाही मंत्र्याने शासकीय इस्पितळात भरती होण्याची हिंमत का दाखवली नाही?, असा सवाल भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस कोरोना झाल्यानंतर सरकारी हॉस्पिटल भरती झाले. यावरून सत्ताधारी पक्ष आपली आरोग्य यंत्रणा अप्रतिम असल्याचा निर्वाळा देत पाठ थोपटून घेत आहे. मग कोरोनाची लागण झालेल्या १६ पैकी एकाही मंत्र्याने शासकीय इस्पितळात भरती होण्याची हिंमत का दाखवली नाही?

भातखळकर यांच्या या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. यावर बहुतांश प्रतीक्रिया या भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे समर्थन करणाऱ्या आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here