महाआघाडीचं सरकार लवकरच पडणार हे शरद पवारांनाही माहिती; ‘या’ भाजप नेत्याचा दावा

मुंबई :

‘उद्धव ठाकरेंना सर्व आयतं मिळालं आहे. तरीही त्यांना साधं दुकानही चालवता येत नाही. त्यांनी अंगावर, छाताडावर येण्याची वार्ता करू नये. जेवढे दिवस मुख्यमंत्री म्हणून मिळालेत, ते दिवस घालवावेत. हे सरकार स्वत:हून कोसळणार आहे. आम्हाला पाडण्याची गरज नाही. सरकार पडणार हे शरद पवारांनाही माहीत आहे’, असा दावा करत माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

ते म्हणाले की, एका केंद्रीय मंत्र्यांबद्दल खालच्या थराला जाऊन बोलणं योग्य नाही. हे मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे. तुम्ही दुसऱ्यांचे बाप काढाल तर आम्हीही तुमचे बाप काढू. दुश्मन कितीही मोठा असला तरी आम्ही त्याची पर्वा करत नाही. आता ज्या भाषेत बोलतील, त्याच भाषेत उत्तर देऊ, तुम्हाला ही धमकी वाटत असेल तर वाटू द्या. उद्धव ठाकरेंना एकेरी उल्लेख करण्याचं लायसन्स मिळलाले आहे काय? असा सवालही संतप्त झालेल्या राणे यांनी विचारला.

काल झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र निलेश व नितीश यांच्यावर टीका केली होती. त्यावरून संतापलेल्या राणेंनी उद्धव ठाकरेंवरही पलटवार केला.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here