उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनाबाधित; ‘या’ रुग्णालयात दाखल, ‘अशी’ आहे त्यांची परिस्थिती

मुंबई :

राज्यात कोरोनाचा वेग जरी मंदावला असला तरी, कोरोना होण्याचे सत्र सुरूच आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. थकवा आणि अस्वस्थता जाणवत असल्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले होते.

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

अजित पवारांनी गेल्या आठवड्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यांनी बारामती आणि परिसराची पाहणी त्यांनी केली. सोलापूर आणि पंढरपूरचा दौरासुद्धा त्यांनी केला होता. त्यानंतर एक-दोन दिवसातच ते घरी क्वारंटाईन झाले होते. एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित नव्हते. 21 ऑक्टोबरला त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पण ती निगेटिव्ह आली होती.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here