गॅस कंपन्यांनी काढला नवीन नियम; ‘ती’ गोष्ट असेल तरच मिळेल गॅस सिलेंडर

मुंबई :

गॅस चोरीचे प्रमाण सध्या वाढत आहे. त्याला अनेक पद्धतीने आळा घालण्याचा प्रयत्न केला असला तरी आता एक जबरदस्त आयडिया गॅस कंपन्यांनी काढली आहे. जर तुम्ही तुमचा संपर्क क्रमांक चुकीचा दिलेला असेल तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही. कारण आता ग्राहकांना OTP असेल तरच गॅस मिळणार आहे. मोबाईलवर OTP आलेला असेल तरच गॅस सिलेंडर मिळेल.

आपल्या घरात इतर कुठलीही गोष्ट नसली तरी चालते सिलेंडर मात्र हवा असतो. परंतु ग्राहकांनी आपल्या गॅस कंपनीला चुकीची माहिती दिल्यास सिलेंडर न मिळण्याचेही संकटही तुमच्यावर येऊ शकते. नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेपासून LPG गॅससाठी नवीन डिलिव्हरी प्रक्रिया लागू करणार आहे. यामुळे नव्या नियमांचे पालन न करणाऱ्या ग्राहकांना गॅस डिलिव्हरिंना अडचण येऊ शकते. सुरुवातीला DAC ची पद्धत १०० स्मार्ट शहरांमध्ये सुरू केली जाणार आहे.

अशी असेल नवी प्रोसेस :-

  • घरगुती गॅस डिलिव्हरीची प्रक्रिया ही फक्त बुकिंग केल्यावर थांबणार नसून बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना एक OTP पाठवण्यात येणार आहे.
  • सिलेंडरची डिलिव्हरी करण्यासाठी डिलिव्हरी बॉय घरी येईल तेव्हा हा OTP त्याला शेअर करणे गरजेचे आहे.
  • जर तुमच्याकडे ओटीपी नसेल तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here