‘हे’ चार शेअर देऊ शकतात भन्नाट पैसे; पहा कोणते आहेत ते, वाचा महत्वाची माहिती

शेअर बाजारातील काही आडाखे आणि अंदाज बांधून आणि भविष्याचा वेध घेण्यासह कंपनीची कामगिरी लक्षात घेऊन अंदाज व्यक्त केले जातात. अशाच पद्धतीने अंदाज व्यक्त करताना चार कंपन्यांचे शेअर मस्तपैकी पैसे मिळवून देऊ शकतात असा अंदाज आहे.

फायनान्शियल टाईम्स यांनी दिलेल्या बातमीत याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. आपणही फ़क़्त ही बातमी लक्षात घेऊन यात गुंतवणूक न करता आपले स्वतःचे आडाखे आणि इतर माहिती यांचा मेळ बसवून काय करायचे ते ठरवावे. मागील तिमाहीत मस्त प्रदर्शन केलेल्या कंपन्यांना ब्रोकरेज कंपन्यांनी पसंती दिली आहे.

HDFC लाइफ इंश्योंरेंस कंपनी, बजाज आटो, एसीसी आणि फेडरल बँक या कंपन्यांकडून २६ टक्के इतके दमदार रिटर्न मिळण्याची शक्यता ब्रोकरेज फर्मला वाटत आहे. टोटल ग्रॉस रीटेन प्रीमियम (GWP) वाढलेल्या HDFC लाइफ यांच्या शेअरला पसंती आहे. सध्या ५६२ रुपये असलेला हा शेअर २६ टक्के परतावा देण्यासाठी ७०४ रुपयांपर्यंत जाऊ शकतो असे बातमीत म्हटले आहे.

तर, बजाज ऑटो १६ टक्के परतावा देण्यापर्यंत वाढू शकतो. यासह एसीसी आणि फेडरल बँक यांच्याकडेही लक्षठेवण्याची गरज आहे. यावर आणखी माहिती आणि अभ्यास करून आपणही गुंतवणूक करावी किंवा करू नये याचा निर्णय घ्यावा.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here