अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप करणारी अभिनेत्री आज ‘या’ पक्षात प्रवेश करणार

मुंबई :

#MeToo या चळवळीच्या माध्यमातून सिनेक्षेत्रातील अनेक मोठी प्रकरणे बाहेर पडली. नंतर काही प्रकरण ही वैयक्तिक द्वेषामुळे उकरून काढली गेल्याच्या घटनाही समोर आल्या. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवरही एका अभिनेत्रीने #MeToo चा आरोप केला होता. अभिनेत्री पायल घोषने #MeToo चा च्या माध्यमातून समोर येत अनुरागवर लैंगिक छळाचे आरोप केले. यानंतर ही अभिनेत्री आता राजकारणात एन्ट्री करत आहे. पायल ही आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे.   पायल घोष RPI चा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

पायलने केलेल्या आरोपा प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी समन्स बजावत कश्यप यांची 8 तास चौकशीदेखील केली होती. या प्रकरणानंतर बॉलिवूडमध्ये दोन गट तयार झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. तर कश्यप यांना एक्स वाईफनं पाठिंबा दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार पक्षाची मोठी जबाबदारी तिच्याकडे देण्यात येणार आहे. पायलसोबत तिचे वकील देखील RPI जॉईऩ करणार आहेत. पायलकडे महिला मोर्चाचं राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते अशी चर्चा आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here