अंबानींच्या रिलायन्सला अमेझोनचा झटका; ‘बिग बाजार’वाला बनण्याच्या स्वप्नांना ब्रेक..!

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणजे भारतातील काहीही करू शकणारी दिग्गज कंपनी. सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या या कंपनीला जगातील बलाढ्य अशा अमेझॉन कंपनीने मोठा झटका दिला आहे.

अंबानींच्या रिलायन्स रिटेलिंग डिव्हिजनने फ्युचर ग्रुपच्या बिग बाजार आणि इतर ब्रांडला ताब्यात घेण्याचा सौदा केला आहे. मात्र, हा सौदा करताना अगोदरच फ्युचर ग्रुपने केलेल्या एका कराराचा भंग केल्याचा ठपका ठेऊन अमेझॉनने मध्यस्त कोर्टाचे दार ठोठावेल होते. आता मात्र, हा निकाल फ्युचर ग्रुपच्या विरोधात गेला आहे.

त्यामुळे भारतीय रिटेल मार्केटमध्ये ‘बिग बाजार’वाला बनण्याच्या रिलायन्सच्या स्वप्नांना ब्रेक लागला आहे. सिंगापुर अंतरराष्ट्रीय आर्बिट्रेशन केंद्र  येथे १६ ऑक्टोबर २०२० रोजी यावर सुनावणी झाली. त्यानुसार ईकॉमर्स कराराचा भंग फ्युचर ग्रुपने केल्याचे निकालात म्हटले आहे. एकूणच यामुळे देशातील रिटेल बाजारातील ही सर्वात मोठी डील आणखी एकदा लांबणीवर पडली आहे.

आता फ्युचर ग्रुप आणि अमेझॉन यांच्यातील बैठकीत यावर काय तोडगा निघतो किंवा इतर कोणत्या न्यायालयात यावर सुनावणी सुरू होते यावर या व्यवहाराची पुढील दिशा ठरणार आहे. एकूणच यामुळे रिलायन्स कंपनीच्या मनसुब्यांना काहीअंशी का होईना पण झटका बसला आहे.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here