भाजपला मोठा धक्का : शिवसेना, अकालीदल पाठोपाठ भाजपने गमावला ‘या’ महत्वाच्या राज्यातील आणखी एक मित्रपक्ष

दिल्ली :

सुरुवातीला महाराष्ट्रातून शिवसेना, पंजाबमधून अकाली दल, काही दिवसांपूर्वी बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पासवान यांचा लोजप NDAच्या बाहेर पडला. नंतर पश्‍चिम बंगालमधील दार्जिलिंग क्षेत्रात प्रभाव असणाऱ्या गोरखा जनमुक्ती मोर्चाने (जीजेएम) बुधवारी NDAच्या बाहेर पडला. आता अशातच अजून एका पक्षाने भाजपला धक्का दिला आहे.केरळ काँग्रेस पीसी थॉमस गटाने भाजप नेतृत्वाखालील सरकारची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपने आणखी एक मित्रपक्ष गमावला आहे. 

केरळ काँग्रेस नेते पी.सी. थॉमस यांनी सांगितले की, दिलेल्या आश्वासनानुसार आपल्या पक्षाला कोणतीही जागा देण्यात आली नसल्यामुळे एनडीएची साथ सोडण्यावाचून कोणताच पर्याय उरला नाही. केरळ काँग्रेस नेते चेन्निथला यांनी यूडीएफमध्ये आपले स्वागत केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान भाजपला एवढे धक्के का मिळत आहेत, याचा आता विचार करण्याची गरज आहे, असे म्हटले जात आहे. एकूणच देशाच्या राजकारणात भाजपचे चाणक्य अमित शहा गायब होणं आणि भाजपला एकापाठोपाठ एक असे धक्के मिळणं, हा योगायोग नाही. भाजपचे मित्रपक्ष जाऊन कॉंग्रेसला मिळत आहेत. थेट विरुद्ध विचारसरणी असतानाही मनमोकळेपणे कॉंग्रेसशी हातमिळवणी करत आहेत.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here